बचत खाते - आता डिजिटल पद्धतीने उघडा

बचत खाते - आता डिजिटल पद्धतीने उघडा

बँकेचे व्यवहार सुरू करताना सर्वसामान्यपणे सेव्हिंग्ज अकाउंट हा प्रकार हमखास निवडला जातो. काटकसर करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे किंवा एखाद्याचा उत्पन्नातील काही भाग बचत करण्याची सवय लागावी ही सेव्हिंग्ज अकाउंट मागील कल्पना आहे. एचडीएफसी बँकसह सेव्हिंग्ज अकाउंट सुरू करण्यासाठी आपण ऑनलाइन अर्ज करून याच्या विस्तृत वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकता आणि विविध प्रकारच्या फीचर्स आणि आकर्षक योजनांचा लाभ मिळवू शकता. ऑनलाइन सेव्हिंग अकाउंट उघडण्याची प्रक्रिया साधी आणि सोपी असून ऑनलाइन असल्यास काही टप्पे पार केल्यानंतर पूर्ण होते.


आता बँकिंगसह आपल्या आजूबाजूच्या सर्व क्षेत्रात डिजिटायझेशन जसे वाढत आहे तसे एचडीएफसी बँकच्या शाखांच्या विस्तृत नेटवर्क असलेल्या ब्रँच आणि एटीएमसह खातेदारही नेटबँकिंग किंवा आमच्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून सेव्हिंग्ज अकाउंटचा लाभ 24X7 पद्धतीने येऊ शकतो. लाइफस्टाइल आणि आरोग्य सुविधांच्या लाभासह डेबिट कार्डवरील अनन्यसाधारण योजना आणि ऑफर्स देखील मिळतील. एचडीएफसी बँक सेव्हिंग्ज अकाउंटच्या काही प्रकारांमध्ये तर एटीएममधून अमर्याद रोख रक्कम काढणे आणि झिरो-बॅलन्स मेन्टेनन्स अशा प्रकारची वैशिष्ट्ये देखील आहेत, जे सेव्हिंग्ज अकाउंटला अधिकच आकर्षक करतात.

   

तर मग वाट कशाची बघताय? हीच ती योग्य वेळ आहे  एचडीएफसी बँकमध्ये सेव्हिंग्ज अकाउंट सुरू करत आपल्या बचतीच्या प्रवासाची त्वरित सुरूवात करावी.

*रेग्युलर सेव्हिंग्स, विमेन्स, सेव्हिंग्समॅक्स, सिनिअर सिटीझन आणि डिजीसेव्ह युथ अकाउंट ही देखील डिजीटल पद्धतीने सुरू करता येतात.

आता आपण आपल्या आवडीनुसार सेव्हिंग्ज अकाउंट झटपट सुरू करू शकता !

  • Accountमहिला, ज्येष्ठ नागरिक, युवा आणि प्रिमियम ग्राहकांसाठी विशेष खाती
  • KYCव्हिडिओ KYCसह झटपट, डिजिटल आणि पेपरलेस पद्धतीने खाते सुरू करण्याचा आनंद घ्या
  • आपले डेबिट/एटीएम कार्ड, स्मार्ट बाय आणि पे-झॅप सह मासिक बचत

डिजी सेव्ह युथ अकाउंट

  • आपल्या सर्व गरजांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्स
  • पहिले वर्ष विनामूल्य मिलेनिया डेबिट कार्ड
  • सर्व विभागांत वर्षभर ऑफर्स

रेग्युलर सेव्हिंग्ज अकाउंट

  • चेकपर्सनलाइज्ड (वैयक्तिकृत) चेकबूक विनामूल्य मिळवा
  • कार्डमिलेनिया डेबिट कार्ड किंवा रूपे प्रिमियम डेबिट कार्ड निवडा. आपल्या गरजेसाठी आवश्यकतेनुसार इंटरनॅशनल डेबिट कार्ड घ्या.
  • बिलबिल पे सर्विसच्या माध्यमातून सुरक्षितपणे आपल्या सोयीनुसार आपले बिल भरा

सेव्हिंग्स मॅक्स अकाउंट

  • interest imageस्वयंचलित स्वीप-इन सुविधेसह वापरात नसलेल्या पैशांवर अधिक व्याज मिळवा
  • lifeinsurance imageलाइफटाइम प्लॅटिनम डेबिट कार्ड
  • atm image₹ 1 लाखांपर्यंतचा अ‍ॅक्सिडेंटल हॉस्पिटलायझेश कव्हर मिळवा आणि सुरक्षित रहा
  • एटीएममधून अमर्याद रोख रक्कम विनामूल्य काढा

स्पेशल गोल्ड आणि स्पेशल प्लॅटिनम

  • प्रिमियम लाइफस्टाइलच्या लाभांचा आनंद घ्या
  • अधिक चांगले हेल्थकेअर आणि विमा सुरक्षा कवच मिळवा
  • लॉकर्स, डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंटवर प्राधान्य मूल्य मिळवा
  • वाढीव व्यवहार मर्यादा

विमेन्स सेव्हिंग्ज अकाउंट

  • कार्डआपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी इझीशॉप वुमन्स डेबिट कार्ड मिळवा
  • कॅशबॅकप्रत्येक ₹ 200च्या खर्चावर ₹ 1 कॅशबॅक मिळवा
  • व्याजदरदुचाकीच्या कर्जावर 2% कमी व्याजदराचा आनंद घ्या

सिनिअर सिटीझन्स अकाउंट

  • हॉस्पिटलवार्षिक ₹ 50,000 पर्यंत अ‍ॅक्सिडेंट हॉस्पिटलायझेशन रिइम्बर्समेंट मिळवा
  • हॉस्पिटल15 दिवस हॉस्पिटलायझेशनच्या वेळी रोजच्या ₹500 रोख भत्त्यासाठी दावा करा
  • फिक्स्ड डिपॉझिट्सवर (FDs) प्राधान्य दराचा आनंद घ्या

किड्स अ‍ॅडव्हान्टेज अकाउंट

  • कार्डपालकांच्या संमतीने मुलांसाठी इंटरनॅशनल डेबिट कार्ड मिळवा
  • शिक्षण₹ 1 लाखाचा विनामूल्य शिक्षण विमा मिळवा
  • निधीदरमहा ₹ 1,000चा भविष्य निधी तयार करा

इन्स्टिट्यूशनल सेव्हिंग्ज अकाउंट

  • देणग्याकॅश मॅनेजमेंट सर्विसेसच्या माध्यमातून देणग्या आणि शुल्क व्यवस्थापित करा
  • पेमेंटएचडीएफसी बँक पेमेंट गेटवे इझी कलेक्शनसह आपले खाते जोडा
  • पेमेंटऑनलाइन पद्धत वापरून कर्मचारी, विक्रेते इत्यादींची देयके सुलभ करा

गव्हर्न्मेंट स्कीम बेनेफिशिअरी सेव्हिंग्ज अकाउंट/personal/save/accounts/savings-accounts/government-scheme-beneficiary-savings-account

  • आपल्या बँकिंग गरजेसाठी प्रिमियम डेबिट कार्डची निवड करा
  • कार्डदरमहा ₹ 10लाखापर्यंत अधिक मर्यादेच्या रोख व्यवहाराचा आनंद घ्या
  • बिलविनामूल्य बिलपे सुविधेच्या माध्यमातून सोप्या देयकाचा पर्याय निवडा

बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाउंट (BSBDA) स्मॉल अकाउंट

  • अकाउंटझिरो-डिपॉझिट, झिरो बॅलन्स अकाउंटचा आनंद घ्या
  • कार्डआपले खाते वापरण्यासाठी विनामूल्य रूपे कार्ड मिळवा
  • रक्कमदरमहा एटीएममधून 4 वेळा विनामूल्य रोख रक्कम काढा

सेव्हिंग फार्मर्स अकाउंट

  • कार्डआपले खाते वापरण्यासाठी विनामूल्य एटीएम कार्ड मिळवा आनंद घ्या
  • एचडीएफसी बँक एटीएम्समधून 5 विनामूल्य व्यावहारांचा आनंद घ्या
  • बिलविनामूल्य बिलपे सुविधेच्या माध्यमातून सोप्या देयकाचा पर्याय निवडा

बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाउंट

  • अकाउंटझिरो बॅलन्स सेव्हिंग्ज अकाउंटचा आनंद घ्या
  • कार्डआपले खाते वापरण्यासाठी विनामूल्य रूपे कार्डचा वापर करा
  • रक्कमदरमहा शाखेमधून 4 वेळा विनामूल्य रोख रक्कम काढा
FAQs

FAQs

1.   सेव्हिंग्ज अकाउंट म्हणजे काय ?

ज्यांना आपल्या उत्पन्नातील काही भाग बचत करून ठेवावयाचा आहे अशांसाठी पैसे जमा करण्याचे सेव्हिंग्ज अकाउंट हे एक खाते आहे. बँक खात्याचा हा एक असा प्रकार आहे, जिथे तुम्ही तुमची रक्कम ठेवू शकता, त्यावर व्याज मिळवू शकता आणि शिवाय कोणत्याही वेळी त्यातून रक्कम काढू शकता. यात रोख रक्कम सहज ठेवण्याची सोय आहे.

2.   ऑनलाइन पद्धतीने सेव्हिंग्ज अकाउंट  कोणाला कसे सुरू करता येईल ?

ऑनलाइन सेव्हिंग्ज अकाउंट  सुरू करण्याची प्रक्रिया साधी आणि बऱ्यापैकी सोपी आहे. आपल्या घरातल्या आरामदायी वातावरणातूनच तुमची ऑनलाइन बँक अकाउंट प्रक्रिया सुरू करण्यासाठी Click here. वैयक्तिकरित्या शाखेमध्ये येणे टाळण्यासाठी एचडीएफसी बँकत आपण व्हिडिओ KYC (Know Your Customer) सुविधेचा पर्याय देखील निवडू शकता.

3.   सेव्हिंग्ज अकाउंट कोणत्या वेगवेगळ्या प्रकारची आहेत ?

 एचडीएफसी बँकत वेगवेगळ्या प्रकारची सेव्हिंग्ज अकाउंट आहेत सेव्हिंग्ज मॅक्स अकाउंट, डिजीसेव्ह युथ अकाउंट, विमेन्स सेव्हिंग्ज अकाउंट, सिनिअर सिटीझन सेव्हिंग्ज अकाउंट ही त्यापैकी काही नावे आहेत. वेगवेगळ्या गटातील ग्राहकांची गरज ओळखून ही अशी वेगवेगळ्या प्रकारची सेव्हिंग्ज अकाउंट  तयार करण्यात आली आहेत.

4.   सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये कमीत कमी किती शिलकीची आवश्यकता असते ?

कमीत कमी आवश्यक असलेली शिल्लक किंवा मासिक सरासरी शिल्लक (Average monthly balance – AMB) ही ग्राहकाने कोणत्या प्रकारचे खाते निवडले आहे तसेच खातेदाराचे ठिकाण यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, एचडीएफसी बँक रेग्युलर सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये खाते उघडण्यासाठी सुरुवातीला मेट्रो / शहरी शाखांत कमीत कमी 7500 डिपॉझिट, निमशहरी शाखांत  5,000 आणि ग्रामीण भागातील शाखांत 2,500 असणे आवश्यक आहेत.

5.   सेव्हिंग्ज अकाउंटवर व्याजदर किती आहे ?

सामान्यतः भारतातील बँक्स  सेव्हिंग्ज अकाउंटवर 3.5% ते 7% दरम्यान व्याजदर दिले जाते. एचडीएफसी बँक सेव्हिंग्ज अकाउंटवर दिल्या जाणाऱ्या व्याजदराची कल्पना येण्यासाठी पुढील तक्त्याकडे लक्ष द्या.

सेव्हिंग्ज बँक बॅलन्स 

·      ₹ 50 लाख आणि त्यापुढे

·      ₹ 50 लाखांपेक्षा कमी

11 जून 2020 पासून बदलण्यात आलेले दर

·      3.50 %

·      3.00%

नोंद घ्या :

सेव्हिंग्ज अकाउंटवरील व्याज हे आपल्या खात्यावरील कायम ठेवल्या जाणाऱ्या दैनंदिन शिलकीवर आकारले जाईल.

सेव्हिंग्ज अकाउंटवरील व्याज तिमाही पद्धतीने दिले जाईल

6.   सेव्हिंग्ज अकाउंट मधून रक्कम हस्तांतर कशी करता येईल ?

आपल्या सेव्हिंग्ज अकाउंट मधून रक्कम हस्तांतर करण्याचे काही मार्ग आहेत. प्रथम, तुमच्या सेव्हिंग्ज अकाउंट मधून अन्य कोणाच्या खात्यात अगदी तातडीने पैसे हस्तांतर करण्यासाठी आपण आपल्या बँकिंगचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन वापरू शकता. डिजिटल पद्धतीने तातडीने आणि सोप्या पद्धतीने पैसे हस्तांतर करण्यासाठी नेटबॅंकिंग हा देखील एक पर्याय आहे. आपण वैयक्तिकरित्या बँकेच्या शाखेत देखील भेट देऊ शकता आणि तुमच्या बँक खात्यातून रक्कम हस्तांतर करू शकता.

7. एखाद्याने उत्तम सेव्हिंग्ज बँक अकाउंट कसे निवडावे ?  

आपल्या वैयक्तिक गरजेला अनुसरून सेव्हिंग्ज अकाउंट निवडणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. एचडीएफसी बँकमध्ये, आपण आमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सेव्हिंग्ज अकाउंटची तुलना करू शकता आणि आपल्या गरजेनुसार जे सर्वोत्तम वाटेल त्याची निवड करू शकता. लक्षात घेण्यासारख्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे उपलब्ध असलेले व्याजदर, आवश्यक असलेली कमीत कमी मासिक शिल्लक आणि रोख पैसे काढण्यासंबंधी असलेल्या विविध आवश्यकता.

8.   ऑनलाइन पद्धतीने सेव्हिंग्ज अकाउंट  सुरू करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ?  

एचडीएफसी बँक सेव्हिंग्ज अकाउंटसाठी अर्ज करताना पुढीस कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे :

·      ओळखपत्र (वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट इत्यादी.)

·      रहिवासाचा दाखला (वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट इत्यादी.)

·      पॅन कार्ड

·      फॉर्म 16, हे अर्जदाराच्या कंपनीद्वारे जारी केलेले प्रमाणपत्र आहे, ज्यामध्ये तुमच्या पगारातून टीडीएस वजा करण्यात आला आहे, असे प्रतिपादन केलेले असते. अर्जदाराकडे पॅन कार्ड नसल्यास हे आवश्यक आहे.

·      दोन अलिकडे काढलेले पासपोर्ट साइजचे फोटो

 स्वीकारल्या जाणाऱ्या ओळख / रहिवासाचा पुरवा संबंधी कागदपत्रांची यादी पुढीलप्रमाणे.

·      वैध पासपोर्ट

·      भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने जारी केलेले मतदार ओळखपत्र

·      वैध कायम वाहन चालविण्याचा परवाना

·      आधार

·      NREGA द्वारे जारी करण्यात आलेले आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी असलेले रोजगार प्रमाणपत्र

·      नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरकडून मिळालेले पत्र ज्यामध्ये नाव आणि पत्त्याचा उल्लेख असेल

आधार, पॅन कार्ड आणि वापरात असलेला मोबाइल क्रमांक याद्वारे ऑनलाइन पद्धतीने खाते सुरू करणे सोपे आहे.