Features

Eligibility

आमच्या बँकेत नियमित बचत खातं सुरु करण्यासाठी खालील लोकं पात्र आहेत :


  • निवासी व्यक्ती (एकमेव किंवा संयुक्त खाते)

  • हिंदू अविभाजित कुटुंबे

  • भारतात राहणारे परदेशी नागरिक*

  • 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची अल्पवयीन मुलं स्वत:चं Self Operated Minor account उघडण्यास पात्र आहेत. या अल्पवयीन मुलाला एटीएम/डेबिट कार्ड जारी केले जाऊ शकते

*परदेशी नागरिक १८० दिवसांपेक्षा जास्त काळ भारतात राहत असणं गरजेचं आहे. यासाठी त्यांच्याकडे वैध पासपोर्ट, वैध व्हिसा, परराष्ट्र प्रदेश नोंदणी कार्यालयाचं प्रमाणपत्र आणि निवासी परमीट असणं गरजेचं आहे. 

खातं उघडण्यासाठी किमान रकमेची मर्यादा


  • शहरी भागातील शाखांमध्ये (Urban Branches) नियमीत बचत खातं सुरु करण्यासाठी किमान १० हजार रुपये, निम-शहरी भागांमध्ये (Semi-Urban Branches) ५ हजार तर ग्रामीण भागातील शाखांमध्ये किमान अडीच हजार रुपयांची आवश्यकता आहे.

  • शहरी शाखांसाठी किमान सरासरी मासिक १०,००० रुपये, निम शहरी शाखांसाठी ५००० रुपये आणि ग्रामीण शाखांसाठी किमान १ वर्ष १ दिवसाच्या कालावधीसाठी सरासरी तिमाही शिल्लक २५०० रुपये किंवा १०,००० रुपये निश्चित ठेव म्हणून ठेवणे बंधनकारक आहे.

  • बचत खात्यात आवश्यक सरासरी शिल्लक राखली गेली नाही, तर खालील नॉन-मेंटेनन्स शुल्क आकारले जाईल:

खात्यात किमान रक्कम न राहिल्यास आकारण्यात येणारे चार्जेस*

महिनाअखेरीस खात्यातील किमान रक्कम 

(रुपयांमध्ये)

मेट्रो आणि शहरी भागांमधील खात्यासाठी किमान मर्यादा १० हजार रुपये

निम शहरी भागांतील खात्यासाठी किमान मर्यादा ५ हजार रुपये

>=७,५०० ते < १०,०००

Rs. १५०/-

NA

>=५,००० ते < ७,५००

Rs. ३००/-

NA

>=२,५०० ते < ५,०००

Rs. ४५०/-

Rs. १५०/-

० ते < २,५००

Rs. ६००/-

Rs. ३००/-

*सेवा कर + सेस लावला जाऊ शकतो

सरासरी तिमाही रक्कम (रुपयांमध्ये)

ग्रामीण भागातील शाखांमध्ये शिल्लक रक्कम न ठेवल्यास (प्रति तिमाही) लागणारं शुल्क

>= १००० < २,५००

Rs. २७०/-

० - <१०००

Rs. ४५०/-

**सेवा कर + सेस लावला जाऊ शकतो

एक्यूबी - सरासरी तिमाही शिल्लक

Fees & Charges