You've Been Logged Out
For security reasons, we have logged you out of HDFC Bank NetBanking. We do this when you refresh/move back on the browser on any NetBanking page.
OK- Home
- PAY Cards, Bill Pay
- Money Transfer
- To Other Account
- To Own Account
- UPI (Instant Mobile Money Transfer)
- IMPS (Immediate Payment 24 * 7)
- RTGS (Available 24 * 7)
- NEFT (Available 24 * 7)
- RemitNow Foreign Outward Remittance
- Remittance (International Money Transfers )
- Religious Offering's & Donation
- Forex Services for students
- Pay your overseas education fees with Flywire
- ESOP Remittances
- Visa CardPay
- Cards
- Bill Payments
- Recharge
- Payment Solutions
- Money Transfer
- SAVE Accounts, Deposits
- INVEST Bonds, Mutual Funds
- BORROW Loans, EMI
- INSURE Cover, Protect
- OFFERS Offers, Discounts
- My Mailbox
- My Profile
- Home
- PAY Cards, Bill Pay
- Money Transfer
- To Other Account
- To Own Account
- UPI (Instant Mobile Money Transfer)
- IMPS (Immediate Payment 24 * 7)
- RTGS (Available 24 * 7)
- NEFT (Available 24 * 7)
- RemitNow Foreign Outward Remittance
- Remittance (International Money Transfers )
- Religious Offering's & Donation
- Forex Services for students
- Pay your overseas education fees with Flywire
- ESOP Remittances
- Visa CardPay
- Cards
- Bill Payments
- Recharge
- Payment Solutions
- Money Transfer
- SAVE Accounts, Deposits
- INVEST Bonds, Mutual Funds
- BORROW Loans, EMI
- INSURE Cover, Protect
- OFFERS Offers, Discounts
- My Mailbox
- My Profile
- Home
- PAY Cards, Bill Pay
- Money Transfer
- To Other Account
- To Own Account
- UPI (Instant Mobile Money Transfer)
- IMPS (Immediate Payment 24 * 7)
- RTGS (Available 24 * 7)
- NEFT (Available 24 * 7)
- RemitNow Foreign Outward Remittance
- Remittance (International Money Transfers )
- Religious Offering's & Donation
- Forex Services for students
- Pay your overseas education fees with Flywire
- ESOP Remittances
- Visa CardPay
- SAVE Accounts, Deposits
- INVEST Bonds, Mutual Funds
- BORROW Loans, EMI
- INSURE Cover, Protect
- OFFERS Offers, Discounts
- My Mailbox
- My Profile
- Personal
- content/bbp/repositories/723fb80a-2dde-42a3-9793-7ae1be57c87f?path=/Menu Icons/save.svgSAVE
- content/bbp/repositories/723fb80a-2dde-42a3-9793-7ae1be57c87f?path=/Menu Icons/accounts.svgAccounts
- ThisPageDoesNotContainIconSavings Accounts
- Regular Savings Account Mararthi
- Terms and Conditions
नियम आणि अटी
1.1 | जमा झालेल्या पगाराचा परतावा : मी याद्वारे निर्विवाद आणि बिनशर्तपणे बँकेला अधिकृत करतो की, नियोक्ता / कंपनीकडून जादाची रक्कम माझ्या खात्यात जमा झाल्याची माहिती देत, बँकेला विनंती केल्यास आणि तशी सूचना देऊन माझ्या खात्यातील रक्कम रोखून ठेवावी /वजा करावी/ जमेचा परतावा करून घ्यावा. अशा प्रकारच्या कोणत्याही रक्कम रोखून ठेवणे / वजा करणे / जमेचा परतावा करणे, यासाठी बँक जबाबदार आणि बांधिल राहणार नाही. | |||||||||||||||||||||||||||||||||
1.2 | मी मान्य करतो की माझे खाते नियोक्ता / कंपनीत माझ्या नोकरीनुसार बँकेत खाते उघडले गेले आहे आणि ``Salary Account `` म्हणून तयार केले गेले आहे. मला हे समजले आहे की, नियोक्ता / कंपनी आणि बँक यांच्यातील व्यवस्थेनुसार बँकेच्या स्वतःच्या निर्णयावर अवलंबून, मला केवळ नियोक्ता / कंपनीकडे असलेल्या माझ्या रोजगाराच्या चलनात किंवा नियोक्ता / कंपनी आणि बँकेमधील व्यवस्था होईपर्यंत Salary Account वर काही सुविधांचा हक्क असू शकेल. मी नियोक्ता / कंपनीसह सेवा बंद करण्याबद्दल बँकेला सूचित करेन. ``नियोक्ता / कंपनी `` हे शब्द सहकारासंबंधी आहेत, जिथे मी कार्यरत आहे आणि त्यांच्या विनंतीनुसार बँकेत Salary Account उघडले आहे. | |||||||||||||||||||||||||||||||||
1.3 | मी समजून घेतले आणि आणि मान्य करतो की Salary Account मध्ये उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विशेष सुविधा म्हणजे नियोक्ता / कंपनी आणि बँक यांच्यात नियमित पगार जमा होण्याचा करार आहे. | |||||||||||||||||||||||||||||||||
1.4 | मी समजून घेतले आणि मान्य करतो की, नियोक्ता / कंपनी यांनी दिलेल्या खाते क्रमांकावर पगार जमा करण्यापूर्वी खाते क्रमांक आणि खातेधारकाचे नाव यांची पडताळणी केली जाणार नाही. | |||||||||||||||||||||||||||||||||
1.5 | मी समजून घेतले आणि मान्य करतो की, पगाराची पत जमा करण्यासाठी योग्य खाते क्रमांक देण्याची जबाबदारी माझ्या नियोक्ता / कंपनी यांच्यावर अवलंबून असेल आणि माझ्या नियोक्ता / कंपनी यांनी दिलेल्या चुकीच्या खाते क्रमांकामुळे उद्भवलेल्या कोणत्याही चुकीच्या जमा रकमांसाठी मी बँकेला जबाबदार धरणार नाही. | |||||||||||||||||||||||||||||||||
1.6 | मी मान्य करतो की, सलग तीन महिन्यांसाठी माझ्या Salary Account मध्ये पगार जमा न झाल्यास खातेदाराला / मला कोणतीही पूर्वकल्पना न देता Salary Account च्या स्थितीमध्ये बदल करून नियमित बचत खाते म्हणून बदल करण्याचे अधिकार बँकेला आहेत. आणि या स्थितीमध्ये बदल झाल्यापासून HDFC Bank Savings Regular Account नुसार नियम आणि अटी लागू होतील. Savings Regular Account ला लागू असणारे नियम आणि अटी हे बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. | |||||||||||||||||||||||||||||||||
1.7 | मी मान्य करतो की, Salary Account मध्ये नियमितपणे नियोक्ता / कंपनी यांच्या सूचनेनुसार पत जमा झाले नाही किंवा मी कोणत्याही कारणास्तव नियोक्ता / कंपनीच्या सेवेत ३० दिवसांची सूचना दिल्यानंतर रुजू झालो नाही, तर बँक आपल्या योग्य अयोग्यतेचे तारतम्य राखून माझे Salary Account बंद करू शकते. | |||||||||||||||||||||||||||||||||
1.8 | मी मान्य करतो की, माझे खाते वापरण्याच्या पद्धतीमध्ये माझ्या खात्याच्या सर्व संयुक्त धारकांच्या संमतीने बँकेकडून बदल घडले जाऊ शकतात. मी मान्य करतो की, खात्याच्या सर्व संयुक्त धारकांच्या संमतीशिवाय खाते वापरण्याच्या पद्धतीमध्ये बँक कोणताही बदल करणार नाही. मी पुढे मान्य करतो आणि सहमती दर्शवितो की, अशा वेळेस बँक खाते उघडण्याच्या वेळी मान्य केलेल्या खाते वापरण्याच्या पद्धतीनुसार निर्देशांचा आदर केला जाईल. | |||||||||||||||||||||||||||||||||
2 | Salary Account ग्राहकांसाठी अतिरिक्त फायदा - Salary Account वर Personal Accidental Death Cover (PADC) | |||||||||||||||||||||||||||||||||
2.1 | Salary Account आणि Titanium Royale Debit Card संदर्भात विस्तृत नियम आणि अटी पुढीलप्रमाणे
Salary Family Account च्या संबंधी नियम आणि अटी पुढीलप्रमाणे आहेत
| |||||||||||||||||||||||||||||||||
2.2 | भरपाईची प्रक्रिया :
| |||||||||||||||||||||||||||||||||
2.3 | Disclaimer : · खातेदार स्पष्टपणे मान्य करतो की, प्रदान केलेल्या कोणत्याही विमा संरक्षणाद्वारे बँक कोणत्याही प्रकारे बांधील राहणार नाही आणि कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी पूर्णपणे जबाबदार असेल आणि अशा विमा संरक्षणासंदर्भात किंवा त्यासंबंधात उद्भवणार्या कोणत्याही बाबतीत बँकेला जबाबदार धरणार नाही, अशा विमा संरक्षणामध्ये काही कमतरता किंवा दोष असल्यास, नुकसानभरपाईची वसुली किंवा भरपाई, प्रक्रिया किंवा दाव्यांचे निराकरण, आणि अशा सर्व बाबी विमा कंपनीबरोबर थेट संपर्क करून सोडवल्या जातील. · खातेधारक पुढे असे मान्य करतो की, प्रदान केलेले विमा संरक्षण फक्त वेतन खात्यांना लागू असलेल्या संबंधित चालू स्थितीतील विमा पॉलिसीच्या अटींनुसारच उपलब्ध असेल. खाते बंद केल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव तात्पुरते किंवा कायमस्वरूपी बचत खात्यात रूपांतरित केले असल्यास, अशा विमा संरक्षणाचा लाभ ते खाते बंद झाल्याच्या तारखेपासून आपोआप रद्द होईल. · पुढे खातेधारक असे मान्य करतो की, त्याचे खाते सुरू असताना, बँक कोणत्याही वेळी अशा प्रकारच्या विमा संरक्षणाचा लाभ निलंबित करू किंवा काढू शकेल किंवा रद्द करू शकेल आणि हा लाभ सुरू ठेवण्यासाठी बँक बांधील नसेल. · विमा कंपनी बदलण्याच्या अधीन असू शकते आणि विमा संरक्षण चालू स्थितीतील विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन असू शकते. | |||||||||||||||||||||||||||||||||
3 | Kid's Advantage Account | |||||||||||||||||||||||||||||||||
3.1 | अज्ञान व्यक्तीच्या वतीने त्याच्या / तिच्या नैसर्गिक पालकांद्वारे किंवा सक्षम कार्यक्षेत्रातील कोर्टाद्वारे नियुक्त केलेल्या पालकांद्वारे खाते उघडले जाऊ शकते. उपरोक्त खात्यातील अज्ञान व्यक्ति सज्ञान होईपर्यंत वरील खात्यातील सर्व व्यवहारात पालक अज्ञान व्यक्तीचे प्रतिनिधित्व करतील. अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यावर पालकांचा खाते चालवण्याचा हक्क रद्दबातल केला जाईल. | |||||||||||||||||||||||||||||||||
3.2 | पालक मान्य करतात की, अज्ञान व्यक्तीचे खाते कोणत्याही Overdraft किंवा कोणत्याही कर्ज घेण्याच्या सुविधेस पात्र ठरणार नाही. | |||||||||||||||||||||||||||||||||
3.3 | कोणत्याही कारणास्तव अज्ञान व्यक्तीच्या खात्यामध्ये अपुरी शिल्लक असल्यास किंवा खात्यातून मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढली असल्यास, त्या खात्यावर काढलेल्या कोणत्याही धनादेशाचा अनादर करण्याचा हक्क बँकेला असेल आणि त्यामुळे उद्भवलेल्या कोणत्याही परिणामासाठी बँक जबाबदार राहणार नाही. | |||||||||||||||||||||||||||||||||
3.4 | पालक मान्य करतात की, ATM / Debit Card जारी केल्यावर ATM / Debit Card ला लागू असलेल्या सर्व नियम व अटी व त्याच्या वापराचे नियम येथे उल्लेख केल्याप्रमाणे लागू असतील. | |||||||||||||||||||||||||||||||||
3.5 | पालक सहमत असून मान्य करतात की, अज्ञान व्यक्तीने खात्यातून, ATM / Debit Card चा वापर करून पैसे काढल्यास अज्ञान व्यक्तीस वैयक्तिकरित्या अल्पवयीन असल्याने कोणतेही दायित्व नसेल. त्यानुसार, अशी संपूर्ण जबाबदारी पालकाची असल्याचे गृहित धरले आहे आणि केवळ पालकांनीच त्याचे पालन केले पाहिजे. अज्ञान व्यक्तीच्या खात्यातून ATM / Debit Cards चा वापर करून रक्कम काढली जाण्यास पालक पूर्णपणे जबाबदार असतील. | |||||||||||||||||||||||||||||||||
3.6 | पालक मान्य करतात की, अज्ञान व्यक्तीच्या खात्यासाठी भरलेले सर्व शुल्क, फी, व्याज, खर्च किंवा कोणतीही जास्तीची काढलेली रक्कम वसूल करण्यासाठी बँक त्याच्या कोणत्याही खात्यातून डेबिट करण्यास पात्र असेल. | |||||||||||||||||||||||||||||||||
3.7 | अज्ञान व्यक्तीच्या खात्यात पालकांसाठी आयुर्विमा संरक्षण यासारखी कोणतीही विशेष सुविधा दिली गेली असल्यास, कलम 15.59.1 आणि 15.59.2 च्या तरतूदीनुसार योग्य ते बदल करून लागू होतील. पालक सहमत आहे की, अशा विमा संरक्षणामुळे किंवा संबंधीत उद्दीष्ट असणार्या कोणत्याही हेतूंसाठी बँक विमा कंपनीला विश्वासाने वैयक्तिक माहितीचा खुलासा करू शकते. | |||||||||||||||||||||||||||||||||
3.8 | पालक मान्य करतो की, कोणत्याही कारणास्तव, दावे, मागण्या, कार्यवाही, नुकसान, तोटा, मूल्य, शुल्काच्या आणि खर्च जे बँकेला कधीही, अज्ञान व्यक्तीचे खाते उघडणे आणि त्यातील व्यवहार तसेच ATM / Debit Card च्या माध्यमातून पैसे काढणे / व्यवहार आणि अल्पवयीन मुलांच्या खात्यात पालकांनी केलेल्या कोणत्याही पैसे काढणे / व्यवहारासाठी अज्ञान व्यक्तीच्या कोणत्याही दाव्यांमुळे होणारे कष्ट किंवा त्याचे परिणाम सोसावे लागले तर त्यासाठी बँकेला कोणत्याही वेळी नुकसानभरपाई देण्यास कबूल करतो. | |||||||||||||||||||||||||||||||||
3.9 | Disclaimer : घटना घडल्यापासून तीस (30) दिवसांच्या आत दावा दाखल करणे आवश्यक आहे आणि दाव्यासंदर्भात सर्व सहाय्यक कागदपत्रे घटना घडल्याच्या तारखेपासून साठ (60) दिवसात कंपनीला सादर करणे आवश्यक आहे. | |||||||||||||||||||||||||||||||||
4 | ``Basic Savings Bank Deposit Account`` | |||||||||||||||||||||||||||||||||
4.1 | मला समजले आहे की, नियामक मार्गदर्शक सूचनांनुसार Basic Savings Bank Deposit Account खातेदार हे HDFC Bank मधील अन्य कोणतेही बचत खाते उघडण्यास पात्र नसतील. | |||||||||||||||||||||||||||||||||
4.2 | अशाप्रकारे, मला मान्य आहे की जर माझे HDFC Bank मध्ये अन्य कोणतेही चालू बचत खाते (एक वा अनेक) असतील, तर Basic Savings Bank Deposit Account उघडल्यानंतर 30 दिवसांच्या आत मला अशा प्रकारची अन्य बचत खाती (एक वा अनेक) बंद करणे गरजेचे आहे | |||||||||||||||||||||||||||||||||
4.3 | मला मान्य आहे की, नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार लागू असल्यास, जर अशी खाती (एक वा अनेक) Basic Savings Bank Deposit Account उघडल्यानंतर 30 दिवसांच्या आत माझ्याद्वारे बंद केली गेली नाहीत तर अन्य बचत खाती (एक वा अनेक) (जर असतील तर) बंद करण्याचे अधिकार बँकेकडे राखीव आहेत | |||||||||||||||||||||||||||||||||
4.4 | एखादी निवासी व्यक्ती आणि त्यांचे KYC पूर्ण नसेल तर ते BSBDA Small Account उघडण्यास पात्र असतात. अधिक नेमके म्हणजे अश्या निवासी व्यक्ती ज्यांच्याकडे पुढील गोष्टी नाहीत : · बँकेच्या कागदपत्रांच्या स्वीकार्य यादीनुसार छायाचित्र असलेले ओळखपत्र · बँकेच्या कागदपत्रांच्या स्वीकार्य यादीनुसार रहिवासी दाखला BSBDA Small Account सुरू करण्यासाठी आवश्यक निकष खाली सूचीबद्ध आहेत | |||||||||||||||||||||||||||||||||
4.5 | BSBDA Small Account असलेले खातेदार पुढील व्यवहार मर्यादेच्या अधीन राहतील : · BSBDA Small Account ची एकूण शिल्लक रक्कम कोणत्याही वेळी कमीत कमी 50,000 पेक्षा अधिक नसावी किंवा · BSBDA Small Account ची एकूण जमा रक्कम कोणत्याही वेळी 1,00,000 पेक्षा अधिक नसावी किंवा · BSBDA Small Account मधील एकूण पैसे काढणे आणि हस्तांतरण महिन्याला रुपये 10,000 पेक्षा अधिक नसावे जर खात्यातील शिल्लक रक्कम रुपये 50,000 ची मर्यादा ओलांडल्यास , त्यापुढे पैसे जमा करण्याची कोणत्याही व्यवहाराला परवानगी दिली जाणार नाही जोपर्यंत Small Account मध्ये शिल्लक रक्कम रुपये 50,000 च्या खाली येत नाही.
जर आर्थिक वर्षात एकूण जमा रक्कम रुपये 1,00,000 पेक्षा पुढे गेली असेल तर ते आर्थिक वर्ष संपेपर्यंत Small Account मध्ये कोणत्याही जमा रकमेच्या व्यवहाराला परवानगी मिळणार नाही.
जमा आणि हस्तांतरणाच्या रकमा रुपये 10,000 च्या पुढे जात असेल तर Small Account मध्ये त्या दिनदर्शिकेतील महिन्याच्या अखेरपर्यंत जमा रकमेचा कोणताही व्यवहार करण्याची परवानगी मिळणार नाही. | |||||||||||||||||||||||||||||||||
4.6 | BSBDA Small Account खातेदार म्हणून मी HDFC Bank कडे पुढील गोष्टी जमा करणे आवश्यक आहे :
· नेमके KYC (ओळखीचा पुरावा, रहिवासी दाखला आणि फोटो) बँकेच्या स्वीकार्य KYC यादीनुसार बँकेत खाते उघडल्यानंतर 24 महिन्यांच्या आत | |||||||||||||||||||||||||||||||||
4.7 | मी समजून घेतले आहे की, BSBDA Small Account चे खातेदार HDFC Bank मध्ये अन्य कोणतेही CASA / TD / RD खाते उघडण्यास पात्र नाहीत, तोपर्यंत मी KYC चे पालन करीन | |||||||||||||||||||||||||||||||||
4.8 | मी मान्य करतो की, BSBDA Small Account उघडल्यानंतर 7 दिवसांच्या आत जर इतर चालू, बचत, मुदत ठेव खाते (ते असल्यास) माझ्याद्वारे बंद केली गेली नाहीत तर, ती बंद करण्याचा अधिकार बँकेकडे आहे. | |||||||||||||||||||||||||||||||||
5 | ``Senior Citizen`` Account : Senior CitizenAccount असलेल्या खातेदारांसाठी अतिरिक्त फायदे
सध्या ही पॉलिसी HDFC ERGO Insurance Company Limited कडे आहे. खालील मथळ्यात विम्याच्या नियम आणि अटी विस्तृत दिल्या आहेत : | |||||||||||||||||||||||||||||||||
5.1 | Accidental Hospitalisation Cover : 1. हे सुरक्षा कवच केवळ Senior Citizen Account धारकापैकी प्रथम धारकांसाठी लागू करण्यात आलेले आहे. 2. हे केवळ भारतात वैध परतावा असलेले सुरक्षा कवच आहे. 3. विम्याच्या कालावधीत शारीरिक दुखापतीमुळे कार्ड धारकाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कमीत कमी २४ तास रुग्णालयात दाखल केले असेल तर, विमा कंपनी जास्तीत जास्त विम्याच्या रकमेपर्यंत वाजवी आणि नेहमीची वैद्यकीय खर्चाची भरपाई करेल. 4. यामध्ये रुग्णालयात राहण्याची व्यवस्था, नर्सिंग काळजी, वैद्यकीयदृष्ट्या पात्र कर्मचाऱ्यांचे लक्ष, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक प्रक्रिया आणि वैद्यकीय उपभोग्य वस्तूंसाठी रुग्णालयात रुग्ण म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वाजवी शुल्काचा समावेश आहे. 5. दावा स्वीकारून आणि त्यावर प्रक्रिया केली जावी, यासाठी कार्ड धारकाने अपघात झाल्यापासून मागील 6 महिन्यात Debit Card चा वापर करून व्यापारी आस्थापनांमध्ये किमान 1 खरेदी (point of sale) व्यवहार झालेला असावा. रुग्णालयात दाखल होण्याच्या तारखेपूर्वी केलेला व्यवहार – त्याच महिन्यात (अपघाताचा महिना म्हणून) देखील वैध असेल. 6. हे विमा सुरक्षा कवच केवळ निवासी नागरिकांसाठी लागू असेल. हे गैर वैयक्तिक घटकांना लागू होणार नाही. | |||||||||||||||||||||||||||||||||
5.2 | Accidental Hospital Cash : 1. हे रुग्णालयात दाखल केल्याच्या प्रत्येक पूर्ण दिवसासाठी रोख लाभ प्रदान करते, वर्षाकाठी जास्तीत जास्त 15 दिवसांसाठी वर्षातून एकदा 500 रुपये, या उद्देशानुसार दिवस म्हणजे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रत्येक पूर्ण (24 तास) असतील. | |||||||||||||||||||||||||||||||||
5.3 | दावा करण्याची प्रक्रिया : 1. कार्ड धारकाचा अपघात रुग्णालयात दाखल होण्याच्या घटनेदरम्यान, दावेदार / दावेदाराचे प्रतिनिधी यांना खाते असलेल्या शाखेत भेट द्यावी लागेल, आणि शाखा त्या ग्राहकाला आवश्यक असलेल्या कागदपत्रांसंबंधी मार्गदर्शन करेल. शाखेने ही कागदपत्रे प्राप्त केल्यावर, आमच्या Debit Card धारकांसाठी विशेष सद्भावना म्हणून HDFC Bank विमा कंपनीशी दाव्याची प्रक्रिया करण्यासाठी संपर्क करेल. तथापि, शाखेकडून कागदपत्रांची पोचपावती ही भरपाईची कबुली देत नाही. अपघातानंतर रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेनंतर दावेदाराने खाते असलेल्या शाखेला त्वरित कळविणे आवश्यक आहे. धोरणानुसार, विमा कंपनीला (बँकेच्या माध्यमातून) अपघातानंतर 30 दिवसांत कळविणे आवश्यक आहे. | |||||||||||||||||||||||||||||||||
5.4 | Disclaimer : 1. विमा कंपनी बदलाच्या अधीन असू शकते आणि HDFC Bank कोणत्याही भरपाईसाठी किंवा दाव्यांच्या प्रक्रियेसाठी किंवा कोणत्याही कारणास्तव जबाबदार नाही. | |||||||||||||||||||||||||||||||||
6 | ``Savings Max`` Account : Savings Max Account धारकांसाठी अतिरिक्त लाभ :
सध्या ही पॉलिसी HDFC ERGO Insurance Company Limited कडे आहे. खालील मथळ्यात विम्याच्या नियम आणि अटी विस्तृत दिल्या आहेत : | |||||||||||||||||||||||||||||||||
6. | Accidental Hospitalisation Cover : · हे सुरक्षा कवच केवळ Savings Max Account धारकांसाठी लागू करण्यात आले आहे. · खाते सुरू केल्याच्या तिमाहीच्या नंतरची तिमाही पूर्ण झाल्यानंतर हे लागू असेल. · हे केवळ भारतातच वैध परतावा सुरक्षा कवच आहे. · विम्याच्या कालावधीत शारीरिक दुखापतीमुळे Savings Max Account धारकाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कमीत कमी 24 तास रुग्णालयात दाखल केले असेल तर, विमा कंपनी जास्तीत जास्त विम्याच्या रकमेच्या 1,00,000/- पर्यंत वाजवी आणि नेहमीची वैद्यकीय खर्चाची भरपाई करेल. · यामध्ये रुग्णालयात राहण्याची व्यवस्था, नर्सिंग काळजी, वैद्यकीयदृष्ट्या पात्र कर्मचाऱ्यांचे लक्ष, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक प्रक्रिया आणि वैद्यकीय उपभोग्य वस्तूंसाठी रुग्णालयात रुग्ण म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वाजवी शुल्काचा समावेश आहे. · दावा मान्य करण्यासाठी आणि पुढील प्रक्रिया करण्यासाठी Savings Max Account धारकाच्या प्रथम धारकाला पुढील 2 अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे – · अपघाताच्या तारखेच्या तिमाहीत, सरासरी तिमाहीसाठी रुपये 25,000 इतकी खात्यात शिलकी असावी (किमान रुपये 1,00,000/- च्या मुदत ठेवीसह zero balance account च्या लाभाची पर्वा न करता) · अपघातापूर्वी मागील 3 महिन्यात Debit Card चा वापर करून व्यापारी आस्थापनांमध्ये किमान 1 खरेदी (point of sale) व्यवहार झालेला असावा.
· विमा कंपनीकडून रुपये 1,00,000/- च्या विम्याच्या रकमेपर्यंत हे Accidental Hospitalisation reimbursement cover असेल. विमा कंपनीसमवेत बँकेच्या एका पॉलिसीच्या कालावधीत पूर्ण उपयोगात आणलेला असेल जे नूतनीकरणाच्या अधीन आहेत.
· 24 तासांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असेल, तरच अपघात हा सुरक्षा कवचाअंतर्गत येईल.
· हे सुरक्षा कवच केवळ निवासी व्यक्तींसाठीच लागू असेल. हे गैर वैयक्तिक घटकांना लागू होणार नाही. | |||||||||||||||||||||||||||||||||
6.2 | Accidental Hospitalisation Cash · हे रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक पूर्ण दिवसासाठी रोख लाभ प्रदान करते आणि जर ग्राहक 24 तासांपेक्षा जास्त काळ अपघातामुळे रुग्णालयात दाखल असेल, तर दावा केला जाऊ शकतो. अशा प्रकारचा खर्च दाखविण्यासाठी बिले सादर करण्याची गरज असू शकत नाही. · एका व्यक्तीला एका वर्षात जास्तीत जास्त 15 दिवसांसाठी प्रतिदिन रुपये 1,000/- इतकी याची मर्यादा आहे. · Accidental Hospital Cash हे विमा कंपनीचे देय असेल, जोपर्यंत 15 दिवसांचा कालावधी बँकेच्या पॉलिसीच्या कालावधीत विमा कंपनीकडे संपत नाही, केवळ अशा परिस्थितीत, जेव्हा Accidental Hospital चा दावा स्वीकारला गेला असेल. | |||||||||||||||||||||||||||||||||
6.3 | दुर्घटना झाल्यापासून साठ (60) दिवसांच्या आत कंपनीकडे संबंधित कागदपत्रांसह दावा दाखल करणे आवश्यक आहे आणि दुर्घटनेपासून तीस (30) दिवसांच्या आत दावा करणे आवश्यक आहे. | |||||||||||||||||||||||||||||||||
6.4 | दावा दाखल करण्याची प्रक्रिया · Accidental Hospitalisation च्या प्रक्रियेमध्ये SavingsMax Account च्या दावेदाराने / दावेदाराच्या प्रतिनिधींनी खाते असलेल्या शाखेत भेट द्यावी, आणि शाखा ग्राहकाला आवश्यक असलेल्या कागदपत्रांसंबधी मार्गदर्शन करेल. दाव्यावर प्रक्रिया करण्यासाठी HDFC Bank विमा कंपनीशी संपर्क साधेल. तथापि, शाखेकडून कागदपत्रांची पोचपावती घेणे म्हणजेच दाव्याची स्वीकृती देत नाही. Accidental Hospitalisation च्या घटनेबाबत दावेदाराने खाते असलेल्या शाखेला त्वरित कळविणे आवश्यक आहे. धोरणानुसार, विमा कंपनीला (बँकेच्या माध्यमातून) 30 दिवसांत अपघाताच्या घटनेबद्दल कळविले गेले पाहिजे. | |||||||||||||||||||||||||||||||||
6.5 | Disclaimer · विमा कंपनी बदलाच्या अधीन असू शकते आणि HDFC Bank कोणत्याही भरपाईसाठी किंवा दाव्यांच्या प्रक्रियेसाठी किंवा कोणत्याही कारणास्तव जबाबदार नाही. · दावे विम्याच्या कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या अपवादांच्या अधीन असतील. | |||||||||||||||||||||||||||||||||
6.6 | Accidental Death Cover of Rs. 10 Lac | |||||||||||||||||||||||||||||||||
| · विमा सुरक्षा कवच हे वाहनांमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूला प्रतिबंधित करते (रेल्वे/ रस्ते/ हवाई) · SavingsMax Account च्या केवळ प्रथम धारकाला या सुरक्षा कवचाचा लाभ मिळू शकेल. · दाव्याची प्रक्रिया करण्यासाठी –प्राथमिक खातेदाराकडून अपघातापूर्वी मागील 3 महिन्यात Debit Card चा वापर करून व्यापारी आस्थापनांमध्ये किमान 1 खरेदी (point of sale) व्यवहार झालेला असावा. ज्या महिन्यात मृत्यू झाला आहे, त्याच महिन्यातच हा खरेदीचा व्यवहार झालेला असेल तरी ते वैध राहील. | |||||||||||||||||||||||||||||||||
6.7 | Disclaimer | |||||||||||||||||||||||||||||||||
| · खातेधारकाच्या अपघाती निधनाच्या घटनेमध्ये, दावेदार / दावेदाराचे प्रतिनिधी यांनी खाते असलेल्या शाखेत भेट देणे आवश्यक आहे, आणि शाखा त्या ग्राहकांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांविषयी मार्गदर्शन करेल. · शाखेने ही कागदपत्रे प्राप्त केल्यावर, विशेष सद्भावना म्हणून HDFC Bank विमा कंपनीशी दाव्याची प्रक्रिया करण्यासाठी संपर्क साधेल. · तथापि, शाखेकडून कागदपत्रांची पोचपावती ही दाव्याची कबुली देत नाही. · Accidental hospitalization / मृत्यू या घटनेबाबत, दावेदाराने खाते असलेल्या शाखेत त्वरित कळविणे आवश्यक आहे. · दावा दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व संबंधित कागदपत्रे घटना घडल्यापासून साठ (60) दिवसांच्या आत कंपनीकडे सादर केली गेली असावीत आणि घटना घडल्यापासून तीस (30) दिवसांच्या आत दावा दाखल करावा. · दावे विम्याच्या कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या अपवादांच्या अधीन असतील | |||||||||||||||||||||||||||||||||
7 | Women`s Savings Account | |||||||||||||||||||||||||||||||||
| Women`s Savings Account असलेल्या खातेदारांना अतिरिक्त लाभ
सध्या ही पॉलिसी HDFC ERGO Insurance Company Limited कडे आहे. खालील मथळ्यात विम्याच्या नियम आणि अटी विस्तृत दिल्या आहेत : | |||||||||||||||||||||||||||||||||
7.1 | Personal Accidental Death Cover · केवळ Women`s Savings Account असलेल्या खातेदारांना या सुरक्षा कवचाचा लाभ मिळू शकेल. · दावा मान्य करण्यासाठी आणि त्याची प्रक्रिया करण्यासाठी, Women`s Savings Account च्या प्रथम धारकाकडून अपघाती मृत्यूपूर्वी त्या मागील ६ महिन्यात Debit Card चा वापर करून व्यापारी आस्थापनांमध्ये किमान 1 खरेदी (point of sale) व्यवहार झालेला असावा. ज्या महिन्यात मृत्यू झाला आहे, त्याच महिन्यातच हा खरेदीचा व्यवहार झालेला असेल तरी ते वैध राहील. | |||||||||||||||||||||||||||||||||
7.2 | Accidental Hospitalisation Cover · Women`s Savings Account च्या प्रथम खातेदारास याचा लाभ मिळू शकेल. · हे परतावा पद्धतीचे सुरक्षा कवच केवळ भारतातच वैध आहे. · Women's Savings Account चा प्रथम खातेदाराला शारीरिक दुखापतीमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कमीत कमी 24 तास रुग्णालयात दाखल केले असेल तर, विमा कंपनी जास्तीत जास्त रुपये 1,00,000/- पर्यंतच्या विमा खर्चाची वाजवी आणि नेहमीची वैद्यकीय खर्चाची भरपाई करेल. · यामध्ये रुग्णालयात राहण्याची व्यवस्था, नर्सिंग काळजी, वैद्यकीयदृष्ट्या पात्र कर्मचाऱ्यांचे लक्ष, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक प्रक्रिया आणि वैद्यकीय उपभोग्य वस्तूंसाठी रुग्णालयात रुग्ण म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वाजवी शुल्काचा समावेश आहे · दावा स्वीकारून आणि त्यावर प्रक्रिया केली जावी, यासाठी कार्ड धारकाने अपघात झाल्यापासून मागील 6 महिन्यात Debit Card चा वापर करून व्यापारी आस्थापनांमध्ये किमान 1 खरेदी (point of sale) व्यवहार झालेला असावा. रुग्णालयात दाखल होण्याच्या तारखेपूर्वी केलेला व्यवहार – त्याच महिन्यात (अपघाताचा महिना म्हणून) देखील वैध असेल. · विमा कंपनीकडून रुपये 1,00,000/- च्या विम्याच्या रकमेपर्यंत Accidental hospitalization reimbursement cover परतावा पद्धतीचे सुरक्षा कवच देय असेल. विमा कंपनीसमवेत बँकेच्या एका पॉलिसीच्या कालावधीत पूर्ण उपयोगात आणला असेल तर, ते नूतनीकरणाच्या अधीन आहेत. · जर 24 तासांपेक्षा जास्त काळ अपघातामुळे रुग्णालयात दाखल असेल, तरच दावा केला जाऊ शकतो · हे सुरक्षा कवच निवासी व्यक्तींसाठी लागू आहे.. अनिवासी व्यक्तींसाठी हे लागू नसेल.
| |||||||||||||||||||||||||||||||||
7.3 | Accidental Hospital Cash · हे रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक पूर्ण दिवसासाठी रोख लाभ प्रदान करते आणि जर ग्राहक 24 तासांपेक्षा जास्त काळ अपघातामुळे रुग्णालयात दाखल असेल, तर दावा केला जाऊ शकतो. अशा प्रकारचा खर्च दाखविण्यासाठी बिले सादर करण्याची गरज असू शकत नाही. · एका व्यक्तीला एका वर्षात जास्तीत जास्त 10 दिवसांसाठी प्रतिदिन रुपये 1,000/- इतकी याची मर्यादा आहे. या उद्देशासाठी असलेल्या `त्या दिवशी` पूर्ण दिवसभर (24 तास) रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे. · विमा कंपनीमार्फत बँकेच्या एका पॉलिसीच्या कालावधीत 10 दिवसांपर्यंत Accidental hospital cash देय असेल, केवळ अशा परिस्थितीत accidental hospitalisaton साठी करण्यात आलेला दावा स्वीकारला गेला असेल. · रोख रकमेचा लाभ वर्षातून जास्तीत जास्त एकदाच देय असेल. | |||||||||||||||||||||||||||||||||
7.4 | दावा दाखल करण्याची प्रक्रिया · खातेदाराचे accidental hospitaisation /मृत्यू च्या घटनेपश्चात दावेदार / दावेदाराचे प्रतिनिधी खाते असलेल्या शाखेत भेट देऊ शकतात, आणि शाखा ग्राहकाला आवश्यक असलेल्या कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करेल · शाखेकडे कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर, विशेष सद्भावना म्हणून Women`s Savings Account असलेल्यांसाठी HDFC Bank दाव्यावर प्रक्रिया करण्यासाठी विमा कंपनीशी संपर्क साधेल. · तथापि, शाखेकडून कागदपत्रांची पोचपावती ही दाव्याची कबुली देत नाही. · accidental hospitaisation /मृत्यू च्या घटनेपश्चात दावेदाराने खाते असलेल्या शाखेत त्वरित संपर्क साधावा. · धोरणानुसार, विमा कंपनीला (बँकेच्या माध्यमातून) घटनेनंतर 30 दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. | |||||||||||||||||||||||||||||||||
7.5 | Disclaimer · विमा कंपनी बदलाच्या आधीन असू शकते आणि HDFC Bank कोणत्याही भरपाईसाठी किंवा दाव्यांच्या प्रक्रियेसाठी किंवा कोणत्याही कारणास्तव जबाबदार नाही. · दावे विम्याच्या कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या अपवादांच्या अधीन असतील. · शाखेद्वारे कागदपत्रांची पोचपावती म्हणजे दावा कबूल केल्याचा अर्थ होत नाही. |