FAQs
1. गोल्ड लोन म्हणजे काय?
सोनं किंवा सोन्याच्या दागिन्यांवर तुम्ही घेतलेले कर्ज गोल्ड लोन म्हणून ओळखले जाते. जेव्हा आपण विशिष्ट रकमेच्या बदल्यात आपले सोने बँकेकडे सुपूर्द करता तेव्हा त्याला गोल्ड लोन म्हटले जाते. सोयीस्कर मुदतीसह गोल्ड लोन व्याज दरावर आपल्या सोन्यावर कमीतकमी कागदपत्रांसह कर्ज मिळवा. HDFC सह ही एक जलद व सरळ प्रक्रिया कर्जावरील स्पर्धात्मक व्याजदरासह लवचिक कार्यकाळासाठी येते.
2. गोल्ड लोन मिळण्यास कोण पात्र आहे?
21 ते 60 वर्षे वयोगटातील कोणतेही भारतीय रहिवासी जे व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी, पगारदार आहेत किंवा स्वयंरोजगार मिळवणारी व्यक्ती HDFC बँकेमार्फत गोल्ड लोनसाठी अर्ज करु शकते. आमच्या गोल्ड लोन पात्रता कॅल्क्युलेटरद्वारे आपण आपली पात्रता तपासू शकता.
3. गोल्ड लोन अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
आपण HDFC बँकेसह सोन्यावर कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करू इच्छित असल्यास आवश्यक कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे.
- एक पासपोर्ट साईझ फोटो
- PAN कार्ड (खालीलपैकी कोणत्याही नमूद केलेल्या कागदपत्रांसह) किंवा फॉर्म 60
- पासपोर्ट (Not expired)
- License ड्रायव्हिंग लायसन्स (Not expired)
- मतदार ओळखपत्र
- UIDAI द्वारा जारी केलेले आधार कार्ड
- अॅग्री अलायड ऑक्युपेशन डॉक्युमेंटेशन (शेतीव्यवसाय संबंधित ग्राहकांना बुलेट परतफेड करायची झाल्यास)
4. गोल्ड लोनसाठी तुम्ही कधी अर्ज करावा?
जेव्हा तुम्हाला विशिष्ट हेतूसाठी कर्ज आवश्यक असेल तेव्हा आपण गोल्ड लोनसाठी अर्ज करु शकता. तुमच्या जवळच्या कोणत्याही HDFC बँकेच्या शाखेत काउंटरवर किमान 45 मिनिटांमध्ये कर्ज मिळवू शकता, आपत्कालीन परिस्थितीत ही गोल्ड लोन सुविधा खूप कामी येऊ शकते.
5. गोल्ड लोनची परतफेड न केल्यास काय होईल?
गोल्ड लोनची परतफेड न केल्यास, EMI पेमेंटसंबंधित कर्जदाराची माहिती घेण्याकरिता बँक ईमेल आणि मेसेजद्वारे आठवण करून देईल. निर्धारित कालावधीनंतर काही दंड शुल्क किंवा व्याज दर गोल्ड लोन रकमेवर आकारले जातात. अखेरीस, जर बँकेने ठरवलेल्या मुदतीनंतर सतत पाठपुरावा करूनही गोल्ड लोनची रक्कम दिली गेली नाही तर बँक सोन्याचे दागिने विकून किंवा लिलावात काढून कर्जाची रक्कम मिळवेल.
6. मी गोल्ड लोनची परतफेड कशी करू?
व्याज दर आणि देऊ केलेल्या मुदतीवर मोजल्या जाणार्या सोप्या EMI द्वारे सोन्यावरील कर्जाची परतफेड करता येईल. मुदत कर्जे, ओव्हरड्राफ्ट किंवा बुलेट परतफेड सुविधा यासाठी उपलब्ध आहेत. आपण दरमहा फक्त व्याज किंवा दरमहा नियमित ईएमआय परतफेड करणे निवडू शकता. तुमचा मासिक Outflow रु. 1 लाख वर रू. 1000 (हे 12% p.a. च्या सूचक दरावर आधारित) असेल. आपण बुलेट परतफेड करण्याची सुविधा निवडल्यास 1 वर्षानंतर व्याज आणि मूळ रक्कम परत देता येईल.
7. मी माझे गोल्ड लोन foreclose/Prepay करू शकतो?
होय, आपण गोल्ड लोन foreclose/PrePay करू शकता. मात्र त्यावर काही शुल्क लागू होईल. मुदतपूर्व बंद करण्यासाठी सोन्यावर कर्जासाठी अर्ज केल्याच्या 6 महिन्यांच्या आत बंद केल्यास 2% + जीएसटी शुल्क असेल. 6 महिन्यांनंतर बंद केल्यास मात्र कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.