माझ्या व्यक्तिगत
कर्जासाठी सॅलरी खाते
असण्याचा कोणता फायदा
आहे?
तुमचे जर
एचडीएफसी बँकेत सॅलरी
खाते असेल तर
तुम्हाला हवा तसा
व्याजाचा दर,
प्राधान्यप्राप्त प्रक्रिया
आणि सोपे दस्तऐवज.
कर्जाच्या वितरणासाठी
ह्याचा विचार केला
जातो. तुमच्या
एचडीएफसी बँकेतील
खात्यातून ईएमआय रक्कम
वजा करण्याच्या
तुम्ही स्थायी सूचना
देऊन तुम्ही पैसे
भरू शकता.
मी किती
कर्ज घेऊ शकेन?
तुमची मिळकत आणि
परतफेड क्षमता
ह्यानुसार तुम्ही रू.५०,०००/-
ते रू.१५,००,०००/-
इतके कर्ज घेऊ
शकता. तुम्हाला
कर्जाची रक्कम वाढवायची
असेल तर तुम्ही
तुमच्या पतीपत्नीची
मिळकत एकत्र करू
शकता.
मी माझ्या
व्यक्तिगत कर्जाची
परतफेड कशी करू?
तुम्ही इक्वेटेड मंथली
इन्स्टॉलमेन्टने पैसे
भरू शकता. कर्ज
पुढील तारखांच्या
धनादेशाने किंवा तुमच्या
एचडीएफसी बँकेतील
खात्यातून ईएमआय रक्कम
वजा करण्याच्या
स्थायी सूचना देऊन
कर्जाची परतफेड करू
शकता. दरमहा तुम्ही
किती परतफेड कराल
त्याचा हिशोब करा.
हे कर्ज
घेण्यासाठी मला काय
सिक्युरिटी द्यावी
लागेल?
कर्ज
घेण्यासाठी कोणतीही
सिक्युरिटी किंवा आनुषंगिक
तारण देण्याची गरज
नाही.
कर्जाच्या कालावधीचे
काय पर्याय आहेत?
तुम्ही १२ ते
६० महिन्यांच्या
कालावधीत तुमच्या कर्जाची
परतफेड करू शकता.
माझे कर्ज
मिळविण्यासाठी मला
किती वेळ लागेल?
एकदा तुम्ही तुमचा
अर्ज आणि संबंधित
कागदपत्र सादर केलेत
की सर्व गोष्टी
व्यवस्थित असल्यास
आम्ही ५ दिवसांत आमची मंजुरी
देऊ. सर्व कर्जांना
मंजुरी देणे बँकेच्या
स्वतःच्या निर्णयावर
अवलंबून आहे
मी लवकर
कर्जाची परतफेड करू
शकेन का?
तुम्ही १२ महिने लाभ घेतल्यावर आणि १२ ईएमआयचा तुमच्या बाकी असलेल्या कर्जाच्या
मुद्दलाच्या ४% दराने मुदतपूर्व बंद करण्यासाठी लागणारे शुल्क भरल्यावर तुम्ही
कोणत्याही वेळी कर्जाची परतफेड करण्याची निवड करू शकता.
मी व्यक्तिगत
कर्ज कसे मिळवावे?
व्यक्तिगत
कर्जासाठी अर्ज करणे
खूप सोपे आहे
फक्त ऑनलाईन अर्ज भरा
आणि आमचा
प्रतिनिधी तुमच्याशी
लवकरच संपर्क साधेल.