माझ्यापाशी फक्त एकाच कंपनीचे शेयर्स आहेत मला फक्त एका स्क्रिपवर लोन मर्यादा मिळेल का?
होय. तुम्ही
कोणतीही मंजूर एक स्क्रिप तारण ठेवून मर्यादेचा आमच्या ‘‘सिंगल
स्क्रिप योजनेच्या’’
अंतर्गत लाभ घेऊ
शकता
(ह्या एका स्क्रिपची पैसे घेण्याची क्षमता
२५% ते ५०% ह्याच्या दरम्यान असेल).
माझी
ओव्हरड्राफ्ट मर्यादा निश्चित आहे का?
तुमच्या
पोर्टफोलिओचे ठराविक कालांतराने मूल्यमापन केले जाते,
आणि
तुम्ही तारण ठेवलेल्या समभागांच्या
बाजारपेठेतील मूल्यानुसार तुमची ओव्हरड्राफ्ट मर्यादा बदलत असते. तुम्ही कोणत्याही वेळी अधिक समभाग तारण ठेवून
तुमची
ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवू शकता किंवा ते मागे घेऊन कमी करू शकता.
तुम्ही माझ्या
पोर्टफोलिओचे किती वारंवार मूल्यमापन करता?
आम्ही दर
आठवड्याला ह्या पद्धतीने तुमच्या पोर्टफोलिओचे मूल्यमापन करतो. त्याचबरोबर,
बाजारपेठेतील किंमती खूप
मोठ्या
प्रमाणात कोसळल्या तर आम्ही मध्यावधी मूल्यमापन करतो.
समभाग
कोणाच्या नावे धारण केले जातील?
तुमचे समभाग
तुमच्या स्वतःच्याच नावावर राहतील आणि तुम्ही तुमच्या
पोर्टफोलीओचे लाभ घेऊ
शकाल. ज्याचा अर्थ असा की राईटस,
लाभांश
आणि बोनससारखे समभागधारकाचे सर्व फायद्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकाल.
मला ओव्हरड्राफ्ट रक्कम कशी मिळेल?
आम्ही तुमच्या
नावे एक करंट खाते उघडू ज्यामध्ये आम्ही ओव्हरड्राफ्ट मर्यादा तयार करू. तुमची
ओव्हरड्राफ्ट मर्यादा तुम्ही तारण ठेवलेल्या सिक्युरिटीजची संख्या आणि ह्यावर
अवलंबून असेल.
माझ्या
ओव्हरड्राफ्ट खात्यामुळे मला इतर कोणते फायदे मिळतील?
तुमचे
ओव्हरड्राफ्ट खाते एचडीएफसी बँकेच्या करंट खात्याला असलेल्या सर्व फायद्यांनी
सुसज्ज असते,
उदा.
फोनबँकिंग,
नेटबँकिंग,
बिलपे
आणि एटीएम सुविधा. अजून काय,
सिक्युरिटीजवर कर्जाचे अधिक सुविधा प्राप्त ग्राहक ह्या नात्याने तुम्ही मोफत
आंतरराष्ट्रिय डेबिट कार्डासाठी पात्र असाल(प्रथम धारकासाठी फक्त).
मी किती पैसे
भरावे?
एचडीएफसी
बँकेत व्याजाचा दर सर्वात कमी आहे. अजून काय,
तुम्ही
वापरलेल्या ओव्हरड्राफ्ट वरच आणि तुम्ही जितका काळ ते वापरता तितका काळ फक्त
तुम्ही व्याज भरा. प्रत्येक महिन्याच्या शेवटी तुमच्या खात्यातून व्याज वजा
केले जाते.
माझ्या खात्यात जमा होणारे व्याज दरमहा मी कसे भरावे?
आरबीआय
मार्गदर्शन प्रणाली डीबीओडी.क्र.बीपी.बीसी.१०/२१.०४.०४८/२००४ नुसार कृपया
ह्याची नोंद घ्यावी की तुमच्या खात्यातून वजा होणारे व्याज मासिक कालांतराने
किंवा वेळोवेळी लागू असेल त्यानुसार,
तुमच्या ओव्हरड्राफ्ट खात्यात क्रेडिटसद्वारे सर्व्हिस केले जावे.
*कृपया
ह्याची नोंद घ्यावी की फक्त व्यक्तिगत कारणांसाठी कर्ज दिले जाते. अंदाज
वर्तवून व्यवहार करण्यासाठी किंवा भांडवली बाजाराच्या व्यवहारासाठी किंवा
कोणत्याही समाजविघातक कृत्यासाठी कर्जाचा वापर करता येणार नाही. सर्व क्रेडिट
हे एचडीएफसी बँकेच्या संपूर्ण निर्णयावर अवलंबून असेल.
आताच
अर्ज करा
फक्त ऑनलाइन अर्जाचे प्रपत्र भरा आणि आमचा प्रतिनिधि तुमच्याशी लवकरच संपर्क
साधेल