You are here: व्यक्तिगत बँकिंग कर्ज > गृह कर्ज          English Version          Hindi Version

Home Loans
वैशिष्ट्ये आणि लाभ
आताच अर्ज करा
Home Loans
त्रासरहित गृह कर्जसाठी बघत आहात का?
दोन बेडरुमचा फ्लॅट?

समुद्राकिनारी असलेले सुंदर पेंटहाऊस?
किंवा आपलं स्वप्नातलं स्वतःचे घर बांधण्यासाठी निसर्गाच्या कुशीतली एक जागा?

एचडीएफसी बँक सादर करत आहे एचडीएफसी गृह कर्ज तुमच्या अगदी दारापाशी. तीन दशकांहून अधिक काळची अनुभवी सेवा आणि तज्ञांची सर्वसमर्पण भावनेने काम करणारी तुकडी. एचडीएफसी गृह कर्ज - तुमच्या घराखरेदीच्या सर्व आर्थिक गरजा भागविणारे संपूर्ण पॅकेज, तुमच्या स्वप्नांची पूर्ती करणारे.

एचडीएफसी चे फायदे
  • गृह कर्जाच्या क्षेत्रात प्रथम पाया रोवणारी, 33 हून अधिक वर्षाचा अनुभव असलेली
  • गृहकर्ज उत्पादनांचे कित्येक प्रकार
  • सुरळीत आणि सहज प्रक्रियेसाठी सर्वाधिक अनुभवी आणि अधिकारप्राप्त कर्मचारी
  • मालमत्ता संपादन करण्यासाठी मार्गदर्शन व सल्ला सेवा
  • भारतात कोठेही घर खरेदी करण्यासाठी कोणत्याही कार्यालयातून कर्ज
  • मालमत्तेची निवड करण्यापुर्वी कर्जाची मंजुरी
  • कर्ज परतफेडीचे लवचिक पर्याय
  • दस्तऐवजाची मोफत आणि सुरक्षित साठवणी
वैशिष्ट्ये आणि लाभ
गृह कर्ज - व्यक्तिगत गृह कर्ज घर खरेदी करण्यासाठी (नवे/पुनर्विक्रीचे) किंवा घर बांधण्यासाठी. अर्ज व्यक्तिगत किंवा संयुक्त करता येईल. एचडीएफसी मालमत्तेच्या जास्तीत जास्त ८०% (जागेच्या किंमती सोबत) वित्त पुरवठा करते जे ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेवर अवलंबून असते.
घर सुधारणा कर्ज - कोणत्याही घराच्या अंतर्गत सजावटीवरून मालकाचे व्यक्तिगत प्राधान्य आणि त्यांची अभिरूची दिसून येते व त्यामुळे बदलत्या काळाबरोबर सातत्याने त्यात सुधारणा करणे क्रमप्राप्त होते. घराची अंतर्गत आणि बाहेरील दुरूस्ती आणि इतर स्टक्चरमधील सुधारणा उदा. रंगकाम,वॉटरप्रुफिंग, प्लंबिंग आणि वीजेजे काम, टाईलिंग व फ्लोअरिंग, ग्रिल्स आणि अल्युमिनियम खिडक्या, कंपाऊंडच्या भिंती आणि इतर बरेच काहीसाठी सुविधा पुरविते. एचडीएफसी नूतनीकरणाच्या ८५% पर्यंत वित्त पुरवठा करते. परंतु हे एचडीएफसी द्वारा मूल्यांकन केल्यानुसार मूल्यमापनाच्या अधीन असेल.
गृह विस्तार कर्ज - एचईएल - तुमच्या वाढत्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विद्यमान घरात अधिक जागा समाविष्ट करण्यासाठी, मग तुमच्या मुलांसाठी बेडरूम असो, तुमच्या स्वत:साठी वाचनाची खोली असो किंवा एक आकर्षक कॉफी कॉर्नर असो. तुम्हाला हवे तसे तुमचे घर विस्तारीत करणे सोपे आहे.
जागा खरेदी कर्ज  -मग ती जागा स्वप्नातील घरासाठी असो किंवा भविष्यासाठी गुंतवणूक असो. एचडीएफसी जागा खरेदी कर्ज ही जागा खरेदीसाठीची एक सोयिस्कर सुविधा आहे. एचडीएफसी जागेच्या किंमतीच्या ८०% पर्यंत वित्त पुरवठा करते (अटी लागू). कर्जाची परतफेड जास्तीत जास्त १५ वर्षाच्या कालावधीत करता येईल.
स्थिर व्याजाचा दर किंवा बदलत्या दराची निवड करा व त्यामध्ये तुमचे कर्ज अंशात्मक स्थिर व अंशा त्मक बदलते अशी रचना करण्याचा पर्याय आहे.  
सुलभ परतफेड पर्याय तुमच्या व्यक्तिगत गरजा भागविण्यासाठी.
लोन कव्हर टर्म एशूअरन्स योजना - एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ इन्शूरन्स कंपनी लिमिटेड देऊ करत आहे विमा योजना ज्याचे जीवनातल्या अनिश्चिततेचा तुमच्या कुटुंबाचे हित आणि तुमचे मौल्यवान घर ह्यावर काहीही परिणाम होणार नाही अशा प्रकारे आरेखन करण्यात आले आहे. जीवन विमा घेतलेल्या व्यक्तीचे दुर्दैवी निधन झाल्यास एलसीटीएपी द्वारे ठोस रक्कम दिली जाते.

ह्या शुद्ध जोखिम योजनेचे अशा प्रकारे आरेखन करण्यात आले आहे की तुम्ही जसे गृह कर्ज फेडत जाता तसे ही कमी खर्चाची प्रिमियम विमा योजना होते.
*विमा ही मागणीचा विषय आहे.
गृह कर्ज ईएमआयची आपोआप परतफेड - तुमच्या एचडीएफसी बँकेच्या बचत खात्यातून थेट ईएमआय द्वारे तुमच्या गृहकर्जाची परत फेड करण्याची स्थायी सूचना तुम्ही आम्हाला देऊ शकता. अशा प्रकारे, तुमचा धनादेश मिळविणे, त्यावर स्वाक्षरी करणे व त्यावर लक्ष ठेवणे हा त्रास वाचतो.
एचडीएफसी मालमत्तेच्या दस्तऐवजांची अंतर्गत छाननी करण्याची सुविधा देते.
ग्राहकांचा फायदा - तुम्ही जर एचडीएफसी चे गृह कर्जाचे विद्यमान ग्राहक असाल तर तुम्ही कमी व्याजदराने इतर प्रकारचे कर्ज घेऊ शकता(उदा. व्यक्तिगत कर्ज, कारसाठी कर्ज, दुचाकीसाठी कर्ज, आणि सिक्युरिटीजवर कर्ज).
 
  आताच अर्ज करा
तुम्ही जर नविन ग्राहक असाल आणि तुम्हाला गृह कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर कृपया येथे क्लिक करा.

तुम्ही जर विद्यमान ग्राहक असाल आणि तुमच्या गृह कर्जाबद्दल काही शंका असेल तर कृपया येथे क्लिक करा.

अर्ज करण्याचे इतर मार्गः

*अटी लागू
हे पान ई-मेल करा हे पान छापा
आताच अर्ज करा
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.