You are here: व्यक्तिगत बँकिंग खाते आणि ठेवी > नियमित मुदत ठेव                                 English Version                                 Hindi Version

HDFC Regular FD
वैशिष्ट्ये आणि लाभ
पात्रता
व्याजाचे दर
कर वजावट
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच नोंदणी करा
Regular FD
सहसा विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज)
तुम्हाला जर काही असे प्रश्न असतील ज्यांची येथ उत्तरे देण्यात आलेली नसतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा आम्हाला लिहाः

मी टीडीएससाठी कधी पात्र ठरेन?
टीडीएस कधी वजा केला जातो?
माझ्या ठेवीच्या रकमेत किंवा मुदतीत वाढ केल्यास किंवा बदल केल्यास टीडीएसमध्ये काही बदल होतो का?
कोणत्या दराने टीडीएस कापला जातो?
मी टीडीएसमधून सूट मिळवण्यासाठी कसा आणि केव्हा अर्ज करू शकेन?
बँक टीडीएस प्रमाणपत्र केव्हा देते?
वरिष्ठ नागरिक नसलेल्या व्यक्तीबरोबर संयुक्त खाते उघडता येते का?
वरिष्ठ नागरिक मुदत ठेव उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
मी विद्यमान ग्राहक आहेह्या सुविधेचा लाघ घेण्यासाठी मला स्वतंत्र ग्राहक आयडीची गरज आहे का?
पुढील सर्व मुदत ठेवींसाठी मला वयाचा दाखला द्यावा लागेल का?

मी टीडीएससाठी केव्हा पात्र असेन?
एका शाखेत असलेल्या तुमच्या सर्व ठेवींवर तुम्हाला मिळण्याची शक्यता असलेले एकुण व्याज जर एका वित्तीय वर्षात रू.१०,०००/- हून अधिक असेल तर तुम्ही टीडीएससाठी पात्र असाल.

टीपः टीडीएससाठी करपात्रता शाखेच्या पातळीवर निश्चित केली जाते. अल्पवयीन ठेवीदाराच्या नावे असलेल्या ठेवी देखिल टीडीएससाठी पात्र असतील. ज्या व्यक्तीच्या हाती अल्पवयीन ठेवीदाराची मिळकत समाविष्ट असेल ती व्यक्ती टीडीएसच्या क्रेडिट रकमेचा लाभ घेऊ शकेल.

Top


टीडीएस केव्हा वजा केला जाईल?
वित्तीय वर्षात बँक जेव्हा व्याज देते तेव्हा प्रत्येक वेळी टीडीएस वजा केला  जातो. त्याचबरोबर जमा व्याजावर (जे खातेदाराला अजून दिलेले नाही) देखिल वित्तीय वर्षाच्या शेवटी म्हणजे ३१ मार्च रोजी टीडीएस वजा केला जातो.    
Top


माझ्या ठेवीच्या रकमेत किंवा मुदतीत वाढ केल्यास किंवा बदल केल्यास टीडीएस देय रकमेत काही बदल होतो का?
होय. जर तुमच्या ठेवीच्या रकमेत किंवा मुदतीत वाढ केल्यामुळे अगोदरच्या मुदत ठेवीसह त्यावरील जमा व्याज रू.१०,०००/- हून अधिक असल्यास तुमच्या सध्याच्या ठेवींसाठी टीडीएस कापला जाण्यास तुम्ही पात्र असाल.

टीपः जर सध्याच्या गुंतवणुकीवरील व्याज टीडीएससाठी वजा करण्यासाठी पुरेसे नसेल तर मुद्दलातून टीडीएस वजा केला जाईल.
Top


टीडीएस कोणत्या दराने वजा केला जातो?
खालील खातेदारांच्या गटांसाठी टीडीएस खालील दराने वजा केला जातो :
टीडीएसचे लागू दर असे आहेतः

निवासी व्यक्ती किंवा एचयूएफ कराचा दर अतिरिक्त कर शिक्षण अधिभार एकुण
१० लाख रुपये देय रकमेपर्यंत १०% - ३% १०.३०%
१० लाख रूपये आणि  त्यावरील रक्कम देय १०% १०% ३% ११.३०%
कॉर्पोरेट संस्था कराचा दर अतिरिक्त कर शिक्षण अधिभार एकुण
१ कोटी रुपये देय रकमेपर्यंत २०% --- ३% २०.६०%
१ कोटी रूपये व त्यावरील रक्कम देय २०% १०% ३%

 

२२.६६%
एनआरओ कराचा दर अतिरिक्त कर शिक्षण अधिभार एकुण
१० लाख रुपये देय रकमेपर्यंत ३०% ---- ३% ३०.९०%
१० लाख रूपये आणि त्यावरील रक्कम देय ३०% १०% ३% ३३.९९%
व्यावसायीक संस्था कराचा दर अतिरिक्त कर शिक्षण अधिभार एकुण
१ कोटीहून कमी रक्कम १०% ---- ३% १०.३०%
१ कोटी रूपये आणि त्यावरील रक्कम देय १०% १०% ३% ११.३३%
कॉ-ऑपरेटिव्ह सोसायट्या व स्थानिक अधिकारी संस्था कराचा दर

 

अतिरिक्त कर शिक्षण अधिभार

 

एकुण
१०% - ३%

 

१०.३०%


Top


मी टीडीएसमधून सूट मिळविण्यासाठी कसे आणि केव्हा अर्ज करू शकेन?
जर तुमची वर्षभरातील व्याजाची एकूण मिळकत आयकर कायद्याच्या तरतूदींमधे नमूद केलेल्या मर्यादेत बसणार नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या ठेवींवर टीडीएस कापू नये असे तुम्ही तुमच्या बँकेला कळवावे. आयकर कायद्यातील तरतुदींनुसार तुम्ही एक प्रपत्र सादर करून असे करू शकता. वेगवेगळ्या गटांसाठी आवश्यक असलेल्या पत्रांची यादी खाली देण्यात आली आहे.
खात्याची गटवारी आवश्यक प्रपत्र
व्यक्तिगत १५ एच
कंपन्या १५ एए
कंपन्यांची संघटना १५ एए
विश्वस्त संस्था १५ एए

टीपः
  • तुम्हाला आयकर खात्यातील करनिर्धारण अधिकार्‍याकडून १५एए प्रपत्र मिळवावे लागेल.
  • ग्राहकाने जर १५एच/१५ एए प्रपत्र जरी सादर केले तरी १५एच प्रपत्र सादर करण्यापुर्वी वर्षभरात टीडीएसच्या स्वरूपात वजा करण्यात आलेला कर बँकेद्वारे परत केला जाणार नाही. परंतु ग्राहकाला प्रमाणपत्र  दिले जाईल ज्याचा उपयोग त्यांचे कर परतावा सादर करताना करता येईल.
  • १५एच/१५एए प्रपत्र ज्या वर्षात ते दिले जाते त्याच वित्तीय वर्षात केवळ वैध असेल.
  • बँकेपाशी ठेवलेल्या प्रत्येक ठेवीसाठी स्वतंत्र १५एच प्रपत्र सादर करावे लागेल.
Top


बँक टीडीएस प्रमाणपत्र केव्हा देते?
वित्तीय वर्षात कापण्यात आलेल्या टीडीएससाठी प्रपत्र १६ए मध्ये पुढील वित्तीय वर्षात एप्रिलमध्ये दिले जाईल.
Top


वरिष्ठ नागरिक नसलेल्या व्यक्तीबरोबर संलग्न खाते उघडता येईल का?
होय, जर पहिला खातेदार वरिष्ठ नागरिक असेल तर.
Top


वरिष्ठ नागरिक मुदत ठेव खाते उघडताना कोणते कागदपत्र लागतात?
खाते उघडताना, ग्राहकाला वयाचा पुरावा द्यावा लागतो व त्याद्वारे तो/ती वरिष्ट नागरिक असल्याचे सिद्ध करावे लागते. ह्याची पूर्तता करण्यासाठी, खालील पैकी कोणतेही पुरावे सादर करता येऊ शकतात :
माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला  (इयत्ता १० वी)
एलआयसी पॉलिसी
मतदान ओळखपत्र
पेन्शन पैसे वितरण पत्र
सक्षम अधिकार्‍यांनी दिलेला जन्माचा दाखला
पारपत्र (पासपोर्ट)
संरक्षण खात्याचे ओळखपत्र /सरकारी ओळखपत्र (त्यावर कार्डधारकाचे छायाचित्र, स्वाक्षरी आणि जन्मतारिख असल्यास)
पीएसयू द्वारा दिलेले ओळखपत्र
इंडियन एअरलाईन्स/भारतीय रेल्वे ह्यांनी दिलेले वरिष्ठ नागरिक कार्ड
पॅन कार्ड

Top


मी विद्यमान ग्राहक आहे, ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मला स्वतंत्र ग्राहक आयडीसाठी अर्ज करावा लागेल का?
ह्या उत्पादनाचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र ग्राहक आयडी तयार करण्याची गरज नाही. नविन मुदत ठेवींसाठी तुम्हाला केवळ वयाचा पुरावा द्यावा लागेल. जर वयाचा पुरावा सादर करण्यात आला नसेल तर नेहमीच्या मुदत ठेवींप्रमाणेच व्याज दिले जाईल.
Top


पुढील सर्व मुदत ठेवींसाठी मला वयाचा दाखला द्यावा लागेल का?
पुढील सर्व मुदत ठेवींसाठी मला वयाच्या दाखल्याची पूर्तता करावी लागेल. जेथे पुढील मुदत ठेव सादर करताना ग्राहकापाशी चालू मुदत ठेव असेल तर तो ह्या नियमाला अपवाद असेल. प्रपत्रावर मुदत ठेव क्रमांक लिहावा लागेल. अशा परिस्थितीत, बँकेपाशी वयाचा पुरावा अगोदरच आहे असे गृहित धरले जाईल
Top
  आताच अर्ज करा
     फक्त ऑनलाईन अर्ज भरा आणि आमची प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच साधेल.

अर्ज करण्याच्या इतर पद्धतीः * अटी लागू
हे पान ई-मेल करा हे पान छापा
आताच नोंदणी करा
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.