जुलै ०८,
मध्ये आम्ही आपणाला कळविले होते की एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना लागू असलेला
सेवा कर पुर्वीच्या सेन्च्युरिअन बँकेच्या ग्राहकांना १ ऑक्टोबर ०८ पासून
लागू होईल. आम्ही कळवू इच्छितो की लागू होण्याची तारिखेत आता सुधारणा करण्यात
आली आहे आणि एचडीएफसी बँक सेवा कर फक्त सिस्टम संघटित करण्यात आल्यावर लागू
होईल. लागू होण्याची तारिख लवकरच कळविण्यात येईल.
बँकेचे व्यवहार कोणत्याही
कष्टाशिवाय झाले पाहिजेत. एचडीएफसी बँकेसोबत केलेल्या कष्टांचे फळ मिळते.
ग्राहकांना काहीही हवे असले आणि त्यांची व्यावसायिक स्थिती काहीही असली तरी
सुद्धा आमच्यापाशी इतकी निराकरणे आहेत जी अद्वितीय आहेत.तुम्ही एखाद्या
कंपनीत नोकरीला असाल आणि तुम्हाला साधे बचत खाते हवे असेल किंवा तुमचा
स्वतःचा व्यवसाय करत आहात आणि तुम्हाला एक मजबूत बँक सहकारी हवा आहे,
एचडीएफसी बँकेपाशी
तुमच्यासाठी अचूक निराकरण आहे इतकेच नव्हे तर भविष्यासाठी तुमच्या आरेखनात
सुधारणा करेल अशा योजनांची तुमच्यासाठी शिफारस करू शकेल.
बचत खाते:
ही खाती खासकरून
कालांतराने निधी जमा करण्यासाठी भविष्यासाठी बचतीची सवय अंगी बाणविण्यासाठी आहेत.
तुमचा व्यवसाय काहीही असो,
तुम्हाला
अचूक बँकिंग निराकरण मिळेल ह्याचा आम्हाला विश्वास वाटतो. तुमच्या नावावर एक खाते
उघडा किंवा कुटुंबातील सदस्याबरोबर एक संयुक्त खाते नोंदवा.
आता,
एचडीएफसी
बँकेच्या करंट खात्याद्वारे,
विविध
शहरांत बँकिंगच्या स्वातंत्र्याचा अनुभव घ्या. आमच्या ५२८ शहरांतील १४१२ शाखांमधून
विविध ठिकाणी तुमचे खाते उपलब्ध करून घेण्याची ताकद तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता.
इतकेच नव्हे,
तुमच्या
कार्यालयातून किंवा घरून अगदी बाहेर पाऊल न टाकता तुम्ही तुमचे बँकेचे बहुतेक
व्यवहार अगदी आरामशिर करू शकता.
तुमच्या
स्पर्धकांपासून पुढे राहण्यासाठी तुम्हाला गरज असलेले सर्व फायदे देणारे करंट खाते
तुम्हाला देऊ करून तुमच्या व्यवसायात मदत करणे हे आम्ही आमचे उदिष्ट समजतो.
एचडीएफसी
बँकेत,
व्यवसाय
करण्यासाठी वेळ आणि पैसे लागतात,
त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायाच्या गरजा सतत वाढत असतात. येथे आमची भूमिका सुरू
होते. आम्ही तुम्हाला कित्येक करंट खात्यांच्या पर्यायांमधून तुमच्या व्यवसायाला
अगदी साजेसा पर्याय निवडण्याची संधी देतो. मग त्याचा आकार किंवा व्याप्ती कशीही
असो.
एचडीएफसी बँक करंट खाते उघडा आणि
तुमच्या व्यवसायाचे कामकाज मध्यवर्ती ठिकाणाहून नियंत्रित करा.
तुमच्यासाठी
अगदी योग्य असलेल्या उत्पादनाची निवड करा.
मुदत ठेवी
दीर्घकालीन गुंतवणुक ही प्रत्येकाच्या भविष्यातील गुंतवणुकीचा
महत्त्वाचा हिस्सा असते. कर्जासाठी अर्ज करण्याचा सोपा पर्याय आहे तुमच्या स्वतःच्या
निधीतून मर्यादित काळासाठी मुदत ठेवीवर कर्ज घेणे व अशा प्रकारे तुमच्या गरजा पूर्ण
करणे आणि तुमची बचत सुरक्षित ठेवणे.
वित्त कायदा
, २००७ नुसार
११ मे २००७ पासून वर नमूद करण्यात आलेल्या सर्व आकार आणि शुल्कावर १२% दराने सेवा
कर आणि सेवाकराच्या ३%
दराने शिक्षण अधिभार लागू असेल. स्टेटमेन्टमध्ये
ते स्वतंत्र वजावटीच्या स्वरूपात दर्शविले जाईल.