You are here: व्यक्तिगत बैंकिंग एक्सेस यूअर बैंक > फोन बँकिंग                                 English Version                                 Hindi Version

Phone Banking
वैशिष्ट्ये आणि लाभ
फोनबँकिंग क्रमांक
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच नोंदणी करा
Phone Banking
तुमची अवघी बँक आता तुमच्या फोनमधे अवतरली आहे!

फोनबँकिंग सर्विसेस ह्या ट्रँजॅक्शन प्रकारांच्या अनुसार आयव्हीआर आणि एजंट ऑफरिंगचा मेळ आहे.  कार्ड गहाळ झाल्याचे कळवणं, तक्रारी, विनंत्या आणि चौकश्या नोंदवणे अशा आयव्हीआरवर पूर्ण न होऊ शकणार्‍या, सर्व ट्रँजॅक्शन्ससाठी फोनबँकर  सर्विसेस उपलब्ध आहेत.
फोनबँकिंग द्वारे खालील सेवा उपलब्ध आहेत.
तुमच्या खात्यातील शिल्लक रकमेची माहिती मिळवा -तुमच्या बचत किंवा चालू खात्यातील आणि तुमच्या मुदत ठेवीवरील अगदी शेवटच्या सेकंदापर्यंतची ताजी माहिती मिळवा. तुमच्या खात्यातील शेवटच्या ५ व्यवहारांची देखिल माहिती तुम्हाला मिळेल, किंवा शेवटच्या १५ व्यवहारांचे मिनीस्टेटमेन्ट फॅक्सद्वारे तुम्हाला पाठविले जाऊ शकते
धनादेशाच्या स्थितीची चौकशी करा - भारतात कोठेही देण्यात आलेले किंवा जमा करण्यात आलेल्या धनादेशाची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही फोनबँकिंगचा लाभ घ्या.
धनादेशपुस्तिका/खात्याचे स्टेटमेन्ट मागवा - केवळ फोनबँकिंगशी संपर्क साधा आणि तुमची धनादेशपुस्तिका किंवा तुमच्या खात्याचे ताजे स्टेटमेन्ट तुमच्या दारात मागवा.
 धनादेशाचे पेमेंट थांबवा - एक किंवा अनेक धनादेशांचे पेमेंट थांबवा, दिवसाचे २४ तास.
कर्जाशी संबंधित चौकशी - बाकी कर्जाच्या रकमेची माहिती मिळवा, तुमच्या कर्जाच्या खात्याबद्दल चौकशी करा, व्याजाचे प्रमाणपत्र आणि कर्ज परतफेड वेळापत्रक मिळवा, वगैरे. तुमच्या शहरातील फोनबँकिंगशी संपर्क साधा, तुमच्या पसंतीची भाषा निवडा आणि आमच्या फोनबँकरशी संपर्क साधण्यासाठी "४" डायल करा.
डिमॅटशी संबंधित चौकशी - अकाउंट होल्डिंगचे तपशील, ट्रँजॅक्शनचे तपशील, स्क्रिपचा आयएसआयएन नंबर, डिपॉजिटरी स्लिप्सची स्थिती, क्लायंट मास्टर लिस्टचे तपशील, अकाउंटसाठीचे चार्जेस आणि अन्य माहिती मिळवा. तुमच्या शहरातील फोनबँकिंगला कॉल करा, तुमच्या पसंतीची भाषा निवडा आणि आमच्या फोनबँकरशी बोलण्यासाठी ५ डायल करा.
मुदत ठेवीचे खाते उघडण्यासाठी* # - केवळ तुमच्या बचत खात्यातून निधी हस्तांतरण अधिकृत करून फोनवर मुदत ठेव खाते सहज उघडण्यासाठी आमच्या फोनबँकरशी बोला
खात्याखात्यात निधी स्थानांतरित करा* - तुम्ही तुमच्या एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे स्थानांतरित करू शकता. दोन्ही खाती तुमच्या ग्राहक क्रमांकाशी संलग्न असले पाहिजेत. तुम्ही एका दिवसात रू. १ लाखापर्यंत  रक्कम स्थानांतरित करू शकता.
तुमची बिले भरा - तुमचे सेल्यूलर फोन, टेलिफोन, वीज  बिले फोनबँकिंगद्वारे बिलपेचा उपयोग करून भरा, हे एक सर्वसमावेशक बिल पेमेन्ट निराकरण आहे. बिलपेबद्दल अधिक जाणून घ्या.
 एटीएम/डेबिट कार्ड पिन/नेट बँकिंग आयपिन वगैरे पुन्हा निर्माण करण्याची विनंती - तुमचे एटीएम/ डेबिट कार्ड पिन/नेट बँकिंग आयपिन वगैरे पुन्हा निर्माण करण्यासाठी फोनबँकिंगशी संपर्क करा.
 तुमचे एटीएम/डेबिट/प्रीपेड कार्ड हरविल्याचे कळवा - जर तुमचे एटीएम/डेबिट/प्रीपेड कार्ड हरविले तर तुमची कार्डे अकार्यान्वित (ब्लॉक) करण्यासाठी कोणत्याही फोनबँकिंग क्रमांकावर संपर्क साधा.
 आमच्या इतर सर्व सेवां विषयीची माहिती मिळवा - आमच्या फोनबँकरशी संपर्क साधून एचडीएफसी बँकेच्या सर्व सेवा आणि सुविधां विषयीची माहिती मिळवा.
ताजे व्याजदर/विनिमय दर ह्यांची माहिती मिळवा - आमच्या फोनबँकरशी संपर्क साधून ठेवींवरील ताजे व्याजदर/विनिमय दर ह्यांची माहिती मिळवा.
डिमांड ड्राफ्ट/मॅनेजर्स चेक ह्यांची विनंती करा#** - फोनबँकिंगशी संपर्क साधा आणि डिमांड ड्राफ्ट/मॅनेजर्स चेक तुमच्या दारात मिळवा.
फोन बँकिंग क्रमांक येथे पहा

*मुंबई, दिल्ली, पंजाब, जम्मू आणि काश्मिर/हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल/सिक्किम, आसाम/ओरिसा/मेघालया, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, पाँडिचेरी, कर्नाटक, आणि आंध्र प्रदेश, येथील फोनबँकिंग क्रमांक उपलब्ध.
# ही सुविधा केवळ फोनबँकिंग कालावधीत उपलब्ध आहे. (म्हणजे फोनबँकर्स उपलब्ध आहेत).
**पाठवणी सुविधा केवळ मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नाई, बंगलोर आणि अहमदाबाद येथे उपलब्ध.
 
आताच नोंदणी करा
फोनबँकिंग वापरण्यास तयार आहात? नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
हे पान ई-मेल करा हे पान छापा.
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच अर्ज करा
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.