You are here: व्यक्तिगत बैंकिंग एक्सेस यूअर बैंक > नेटबैंकिंग                                 English Version                                 Hindi Version

Net banking
दृष्टिक्षेप
सुरक्षित उपलब्धता
थर्ड पार्टी हस्तांतरण
इन्स्टा आयपिन सुविधा`
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच नोंदणी करा
नेटबँकिंगला लॉग इन करा
Net banking
थर्ड पार्टी हस्तांतरण
थर्ड पार्टी हस्तांतरण हे नेटबँकिंगचे एक वैशिष्ट्य आहे ज्यासाठी तुम्हाला खास ग्राहक आयडी आणि आयपिन (पासवर्ड) लागेल. तुमची आयडी आमच्या रेकॉर्डसमध्ये सक्रिय आहे ह्याची खात्री करून घेण्यासाठी नेटबँकिंगला लॉगइन करा.

टीपीटी म्हणजे काय?
थर्ड पार्टी ट्रान्स्फर (टीपीटी) द्वारे तुम्ही तुमच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून दुसर्‍या एचडीएफसी बँकेच्या/इतर बँकेच्या खात्यात (लाभधारक) ऑनलाईन भारतात कोठेही पैसे हस्तांतरित करू शकता.

हा प्रत्यक्ष वेळ लागणारा व्यवहार आहे  आणि संबंधित खात्यात ताबडतोब डेबिट आणि क्रेडिट दिसून येईल. ह्या सुविधेसाठी काहीही शुल्क नाही.

*थर्ड पार्टी हस्तांतरण सुरू करता येईल.
  • तुमच्या खात्यातून दुसर्‍या बँकेच्या खात्यात ह्याचा उपयोग करून
    • नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर (एनईएफटी)- दोन कामकाजाच्या दिवसात लाभधारकाच्या खात्यात पैसे जमा होतील.
    • रिअल टाईम ग्रॉस सेटलमेन्ट (आरटीजीएस)- त्याच दिवशी लाभधारकाच्या खात्यात पैसे जमा होतील.
  • तुमच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून दुसर्‍या बँकेच्या खात्यात (वेगळी ग्राहक आयडी)
  • भारतात कोठेही तुमच्या खात्यातून कोणत्याही व्हिसा कार्डावर (डेबिट किंवा क्रेडिट)
  • तुमच्या खात्यातून थर्डपार्टी डिमांड ड्राफ्ट देण्यासाठी

ह्या सुविधेचा उपयोग करून तुम्ही प्रत्येक ग्राहक आयडीला दररोज रू.५,००,०००/- पर्यंत पैसे हस्तांतरित करू शकता. ही रक्कम विभागून किंवा एक रकमी हस्तांतरित करता येईल.

थर्ड पार्टी हस्तांतरण सुविधा कार्यान्वित करण्याची पद्धती
थर्ड पार्टी हस्तांतरण सुविधेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी अर्ज भरा आणि नजिकच्या शाखेत तो सादर करा. हा अर्ज नेटवर उपलब्ध आहे किंवा आमच्या कोणत्याही एचडीएफसी बँकेच्या शाखेत उपलब्ध आहे.
अर्ज शाखेत सादर केल्यावर ४ कार्यालयीन दिवसांनी, तुम्हाला आमच्याकडून एक ई-मेल येईल ज्यामध्ये थर्ड पार्टी एक्शन कार्यान्वित करण्यात आल्याचे तुम्हाला कळविले जाईल.

मी टीपीटीचा कसा उपयोग करू शकेन?
थर्ड पार्टी ट्रान्स्फर सेवेचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला लाभधारक समाविष्ट करावा लागेल.
लाभधारक समाविष्ट करण्याचे टप्पेः
  • www.hdfcbank.com  येथे लॉगइन करा आणि तुमचा ग्राहक आयडी व पासवर्ड (आयपिन) नमूद करा.
  • थर्ड पार्टी हस्तांतरण मध्ये जा आणि ‘‘लाभधारक समाविष्ट करा’’मध्ये जा
  • लाभधारक प्रकार निवडा - बँकेच्या अंतर्गत/इतर बँकेत (एनईएफटीचा उपयोग करून) हस्तांतरण करा/इतर बँकेत (आरटीजीएसचा उपयोग करून) हस्तांतरण करा
  • लाभधारक तपशिल भरा आणि निश्चित करा


निधी हस्तांतरण करण्यासाठी तुम्हाला ज्या खात्यातून निधी हस्तांतरण करायचे आहे ते खाते निवडा आणि लाभधारक देखिल निवडा. तुमच्या व्यवहाराचा तपशिल भरा, व्यवहाराची रक्कम भरा, आणि माहिती सादर करा.

टीपः

  • लाभधारकाच्या खात्याची वैधता ही थर्ड पार्टी हस्तांतरणाचा उपयोग करणार्‍या व्यक्तीची संपूर्ण जबाबदारी असेल.
  • संलग्न खातेधारकापाशी आर्थिक व्यवहाराचे हक्क असल्याखेरिज त्याला निधी हस्तांतरणाची परवानगी दिली जाणार नाही.
  • भागीदारीमधील आर्थिक व्यवहाराच्या हक्कांवर नियंत्रण ठेवणारे खास नियम आहेत.
  • लाभधारकाचा तपशिल २४ तासांनी कार्यान्वित होईल.
  • लाभधारक समाविष्ट करणे ही एकदाच करण्याची प्रक्रिया आहे.
आताच नोंदणी करा
नेटबँकिंगचा उपयोग करण्यास तयार आहात का?  नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
हे पान ई-मेल करा. हे पान छापा
नेटबँकिंग डेमो
आमच्याशी संपर्क साधा
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.