You are here: व्यक्तिगत बैंकिंग एक्सेस यूअर बैंक > नेटबँकिंग                                 English Version                                 Hindi Version

Net banking
दृष्टिक्षेप
सुरक्षित उपलब्धता
थर्ड पार्टी हस्तांतरण
इन्स्टा आयपिन सुविधा
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच नोंदणी करा
नेटबँकिंगला लॉग इन करा
Net banking
सहसा विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज)
तुम्हाला जर काही प्रश्न असतील ज्यांची येथे उत्तरे देण्यात आलेली नाहीत तर कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा आम्हाला लिहा.

नेटबँकिंगसाठी कोण पात्र आहे?
ह्या सेवेसाठी काही शुल्क आहे का?
नेटबँकिंगचा उपयोग करण्यासाठी मी काय करावे?
डिमांड ड्राफ्टची विनंती कोठे करता येऊ शकेल?
मी नविन मुदत ठेव कोठे उघडू शकेन?
‘‘प्रत्यक्ष वेळेतील ऑनलाईन’’ व्यवहार म्हणजे काय?
माझ्या व्यवहारांचा माझ्या खात्यावर केव्हा परिणाम होईल?
माझा व्यवहार पूर्ण झाला आहे हे मला कसे समजेल?
नेटबँकिंगवर माझी विनंती/व्यवहार किती सुरक्षित आहे?
नेटबँकिंग वापरण्यामुळे मला काही खास फायदे होतील का?
नेटबँकिंग अधिक कार्यक्षमतेने वापरण्यासाठी कोणते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची शिफारस केली जाते?
मला पासवर्ड मधील काही आकडे वाचता येत नाहीत, मी काय करावे?
आयपिन (पासवर्ड) पुन्हा निर्माण करण्याची प्रक्रिया काय आहे?
माझ्यापाशी दोन खाती आणि दोन ग्राहक आयडी आहेत. कोणता पासवर्ड कोणत्या ग्राहक आयडीसाठी वैध आहे हे कसे माहित होईल?
माझा नेटबँकिंग आयपिन (पासवर्ड) काम का करत नाही?
माझा पासवर्ड विसरला असेल तर मी कसे लॉगईन करावे?
मी माझा पासवर्ड कसा बदलावा?
मला ‘‘प्रवेश नाकारला’’ असा संदेश येतो. मी काय करावे?
मी माझा पासवर्ड बदलला आहे परंतु मला माझा जुना किंवा नविन पासवर्ड वापरता येत नाही. मी काय केले पाहिजे?
मी माझा आयपिन (पासवर्ड) कसा ब्लॉक करावा किंवा त्याची नोंदणी कशी रद्द करावी?
अधिक सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी मी कोणत्या उपाययोजना करू शकेन?
क्रेडिट कार्डस नेटबँकिंगसाठी कोण पात्र आहे?
क्रेडिट कार्डस नेटबँकिंगसाठी काही शुल्क आहे का?
ह्या सेवेसाठी मी कशी नोंदणी करावी?
क्रेडिट कार्डस नेटबँकिंग वापरण्यासाठी मी काय करावे?
क्रेडिट कार्डस खात्यातील गोषवार्‍यात मला कोणती माहिती पाहता येईल?
क्रेडिट कार्डस नेटबँकिंग मध्ये माझ्यासाठी काही खास फायदे आहेत का?
मी क्रेडिट कार्डस नेटबँकिंगची नोंदणी रद्द कशी करू शकेन?
माझ्या पाशी माझा क्रेडिट कार्ड एटिएम पिन क्रमांक नसेल तर मी क्रेडिट कार्ड नेटबँकिंगसाठी नोंदणी कशी करावी?
अधिक सुरक्षिततेसाठी मी कोणत्या उपाययोजना कराव्यात?


नेटबँकिंगसाठी कोण पात्र आहे?
सर्व एचडीएफसी बँक बचत आणि करंट खाते धारक त्यांचे खाते नेटबँकिंगद्वारे उपलब्ध करून घेऊ शकतात.
Top

ह्या सेवेसाठी काही शुल्क आहे का?
नाही. सध्या, आम्ही सर्व खात्यांना मोफत नेटबँकिंग देऊ करत आहोत. परंतु किमान शिल्लक/ठेव रक्कम ह्याबाबतीतील सर्व आवश्यकतांची पूर्तता करावी लागेल.
Top

नेटबँकिंगचा उपयोग करण्यासाठी मी काय करावे?
सध्या, तुम्ही खालीलपैकी काहीही करू शकता.

शंका -
तुमची शिल्लक तपासून पहा.
तुमचे स्टेटमेन्ट पहा.
धनादेशाची स्थिती तपासून पहा
स्टेटमेन्ट मागवा
धनादेश पुस्तिका मागवा
तुमच्या टिडीएसच्या तपशीलाची चौकशी करा
तुमचे डिमॅट खाते पहा
तुमच्या प्रोफाईलमध्ये सुधारणा करा
एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड बिले पहा
तुमच्या म्युच्युअल फंडाची प्रोफाईल पहा

व्यवहार -

धनादेश थांबवा
तुमची बिले भरा
डिमांड ड्राफ्ट मागवा
तुमच्या एका खात्यातून दुसर्‍या खात्यात निधी हस्तांतरीत करा
थर्ड पार्टीला निधी हस्तांतरीत करा
नविन मुदत ठेवीची विनंती करा
ऑनलाईन खरेदी करा
एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्डाचे देणे भरा
म्युच्युअल फंडाची खरेदीविक्री करा

Top

डिमांड ड्राफ्टची विनंती कोठे करता येऊ शकेल?
आमची जेथे शाखा आहे अशा सर्व ठिकाणी आम्ही डिमांड ड्राफ्ट देऊ शकतो किंवा त्यासाठी आमचे ज्या बँकेबरोबर संबंध आहेत अशा बँकेबरोबर आमची व्यवस्था आहे.
Top

डिमांड ड्राफ्ट ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी काही शुल्क आहे का?
होय ऑनलाईन डिमांड ड्राफ्ट नोंदणी करण्यासाठी असे शुल्क आहेः
  • रू.३० ऑनलाईन नोंदणी केलेल्या आणि ग्राहकाच्या पत्त्यावर पाठविण्याच्या कोणत्याही डिमांड ड्राफ्टसाठी (+अधिक संबंधित बँकेचे शुल्क लागू असल्यास)
  • रू.३० ऑनलाईन नोंदणी केलेल्या आणि थर्ड पार्टीच्या पत्त्यावर पाठविण्याच्या कोणत्याही डिमांड ड्राफ्टसाठी (+अधिक संबंधित बँकेचे शुल्क लागू असल्यास)
Top

मी नविन मुदत ठेव कोठे उघडू शकेन?

संपूर्ण देशातील आमच्या कोणत्याही शाखेत मुदत ठेव उघडता येईल.
Top


‘‘प्रत्यक्ष वेळेतील ऑनलाईन’’ व्यवहार म्हणजे काय?
 आम्ही नेटबँकिंग सेवेचे अशा प्रकारे आरेखन केले आहे की ते तुमची विनंती स्वीकारून त्यावर ताबडतोब कृती करते. तुमच्या शिलकीवर परिणाम करणारे सर्व व्यवहार (डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त) यंत्रणेद्वारे आपोआप केले जातात. उदाहरणार्थ, निधी हस्तांतरण, पैसे थांबविण्याची सूचना, मुदत ठेव विनंती. तुम्हाला दर्शविण्यात येणारी सर्व शिल्लक ही तत्क्षणी असलेली शिल्लक असते आणि कोणत्याही चॅनल्सवरून तुम्ही केलेले व्यवहार त्यात समाविष्ट असतात.  
Top


माझ्या व्यवहारांचा माझ्या खात्यावर केव्हा परिणाम होईल?
ताबडतोब! फक्त डिमांड ड्राफ्टच्या विनंती व्यतिरिक्त, ज्यावर पुढील कार्यालयीन दिवशी बँकेच्या तासांमध्ये प्रक्रिया केली जाईल.
Top


माझा व्यवहार पूर्ण झाला आहे हे मला कसे समजेल?
नेटबँकिंग यंत्रणा तुम्ही विनंती केलेल्या व्यवहारानुसार खालीलपैकी काहीही एक करतेः
  • विनंती केलेली माहिती प्रदर्शित करते
  • तुमच्या सूचना स्वीकारते आणि त्यानुसार योग्य संदेश प्रदर्शित करते किंवा तुम्हाला व्यवहार संदर्भ क्रमांक देते ज्याचा तुम्ही भविष्यातील सर्व संप्रेषणांसाठी तुमच्या व्यवहाराचा संदर्भ म्हणून वापरू शकता.
  • तुमचा व्यवहार का पूर्ण करता येत नाही त्याचा योग्य संदेश प्रदर्शित करते किंवा तुम्हाला पुन्हा प्रयत्न करण्यास सांगते.
Top


नेटबँकिंगवर माझी विनंती/व्यवहार किती सुरक्षित आहे?
तुम्ही जेव्हा एचडीएफसी बँकेच्या नेटबँकिंग सुविधेचा उपयोग करता तेव्हा तुम्हाला संपूर्ण गोपनियतेची खात्री बाळगता येते. तुमच्या नेटबँकिंगच्या व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही कित्येक तपासण्या निर्माण केल्या आहेत. तुम्ही तुमच्या खात्यात प्रवेश करण्यापुर्वी तुम्हाला तुमचा खास ग्राहक आयडी क्रमांक आणि आयपिन (पासवर्ड) नमूद करण्यास सांगण्यात येईल. तुमच्या व्यवहारांची सुरक्षितता आणि गोपनियता सर्वाधिक करण्यासाठी तुमचा पासवर्ड कोणालाही उपलब्ध नसतो, बँकेच्या कर्मचार्‍यांना देखिल नाही.

तुम्ही जेव्हा आमच्याबरोबर इंटरनेटवर बँकेचे व्यवहार करता तेव्हा तुम्ही नेहमीच सुरक्षित पट्यात असता. तुमच्या व्यवहारांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी आम्ही सिक्युअर्ड सॉकेट लेयर (एसएसएल) नावाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करतो, ज्यामध्ये तुम्ही आणि बँक ह्यांच्यामध्ये माहिती सरमिसळ करून देवाणघेवाण केली जाते. जर अनधिकृत उपयोगकर्त्याने तुमचा पासवर्ड कोणता आहे ह्याचा अंदाज घेताना विविध प्रकारची संमिश्र माहिती भरून तुमचे खाते उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमचे खाते आपोआप लॉक होईल. त्याचबरोबर, तुम्ही जेव्हा नेटबँकिंगला लॉगईन करता तेव्हा तुमची मागील लॉगईनची तारिख आणि वेळ दर्शविली जाईल ज्यामुळे इतर कोणीही तुमचे खाते वापरलेले नाही ह्याची तुम्हाला खात्री होईल.

ह्या ऑनलाईन सुरक्षितता वैशिष्ट्यांबरोबर वेब सर्वरच्या उपलब्धतेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि अनधिकृत उपयोग केला जाऊ नये ह्यासाठी आमच्यापाशी एक खास संघ आहे.  

ही वैशिष्ट्ये तुमच्या बँकिंकच्या व्यवहारांची सुरक्षितता सर्वाधिक करण्यासाठी एकत्रितपणे काम करतात. परंतु, संपूर्ण सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमचा व्यवहार पूर्ण केल्यावर कृपया लॉगआऊट करण्याचे लक्षात ठेवा. अधिक माहिती जाणून घ्या.

Top


नेटबँकिंग वापरण्यामुळे मला काही खास फायदे होतील का?
नेटबँकिंगचा उपयोग करण्याचे विविध फायदे आहेतः

  • मोफत धनादेशाचे पैसे थांबविणे
  • स्टेटमेन्टची विनंती
  • मोफत निधी हस्तांतरण
  • बिलपे सुविधा
  • डिमांड ड्राफ्टसाठी श्रेयस्कर दर
Top


नेटबँकिंग अधिक कार्यक्षमतेने वापरण्यासाठी कोणते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची शिफारस केली जाते?
हार्डवेअरः तुमच्यापाशी पेन्टियम पीसी व ३२ एमबी रॅम, २.१ जीबी हार्डडिस्क जागा व ५०० एमबी मोकळी जागा असली पाहिजे.

सॉफ्टवेअरः तुमच्यापाशी ब्राऊजर असला पाहिजेः इंटरनेट एक्सप्लोअरर आवृत्ती ५.५ आणि नेटस्केप नेविगेटर आवृत्ती ४.७.

Top


मला पासवर्ड मधील काही आकडे वाचता येत नाहीत, मी काय करावे?
आयपिन (पासवर्ड) हा यंत्रणेने स्वैरिकृत पद्धतीने तयार केलेला आकडा असतो, आणि तो उपलब्ध असलेली तुम्ही एकमेव व्यक्ती असता. त्यामुळे पासवर्ड पुन्हा निर्माण करण्याचा अर्ज करण्याची आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत.
Top


आयपिन (पासवर्ड) पुन्हा निर्माण करण्याची प्रक्रिया काय आहे?
तुम्ही तुमचा पासवर्ड विसरल्यास तुम्ही तो ऑनलाईन पुन्हा निर्माण करू शकता. तुमचे नेटबँकिंग आयपिन ऑनलाईन रिसेट करण्यासाठी खालील टप्पे आहेतः 
  • ‘इन्स्टा आयपिन’ लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा ग्राहक आयडी क्रमांक लिहा आणि खात्री करा.
  • ग्राहक आयडीला जोडण्यात आलेल्या एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डाची यादी दर्शविली जाईल
  • जोडण्यात आलेले कोणतेही एक कार्ड निवडा
  • तुमचे एटीएम पिन आणि अंतिम मुदतीची तारिख लिहा.
  • तुम्हाला त्यानंतर तुमचा नेटबँकिंगचा पासवर्ड रिसेट (आयपिन) करण्यास आणि त्याची खात्री करण्यास सांगितले जाईल.
  • आता नविन तयार करण्यात आलेल्या पासवर्डने तुम्ही पुन्हा लॉगइन करू शकाल.

  किंवा

      नेटबँकिंग नोंदणी/एचडीएफसी बँकेच्या एटीएमद्वारे पुन्हा निर्माण(रीजनरेशन) विनंती करणे

  • तुमच्या जवळच्या एचडीएफसी बँकेच्या एटीएमला भेट द्या.
  • तुमचे एचडीएफसी बँक डेबिट कार्ड आणि एटीएम पिन टाकल्यावर, मुख्य स्क्रिनवरून ‘‘इतर पर्याय’’ निवडा.
  • ‘‘नेटबँकिंग नोंदणी’’ पर्याय निवडा जो डाव्या बाजूला उपलब्ध आहे.
  • त्याची निवड केल्यावर, कृपया विनंतीची खात्री द्या.
  • बँकेकडे नोंदविलेल्या तुमच्या पत्रव्यवहाराच्या पत्यावर आयपिन कुरिअरने पाठविला जाईल.

    किंवा

    तुमच्यापाशी दूरध्वनि ओळख क्रमांक (टीआयएन) असल्यास तुम्ही फोनबँकिंगशी संपर्क साधू शकता.

  किंवा

        ई-एज बँकिंग प्रपत्र डाऊनलोड करा (खाली), ते पूर्ण भरा आणि जवळच्या एचडीएफसी बँकेच्या शाखेत सादर करा.

 

 
Top


माझ्यापाशी दोन खाती आणि दोन ग्राहक आयडी आहेत. कोणता पासवर्ड कोणत्या ग्राहक आयडीसाठी वैध आहे हे कसे माहित होईल?
खास कारणांसाठी तुम्हाला पाठविण्यात येणार्‍या पासवर्ड मेलरवर आम्ही ग्राहक आयडी किंवा खाते क्रमांक लिहित नाही. त्यामुळे तुमच्यापाशी असलेल्या दोन्ही ग्राहक आयडी आणि पासवर्ड चा उपयोग करून पाहणे, हा त्यासाठी एकमेव उपाय आहे.
Top


माझा नेटबँकिंग आयपिन (पासवर्ड) काम का करत नाही?
आयपिन (पासवर्ड) काम न करण्याची वेगवेगळी कारणे असू शकतातः
  • आयपिन (पासवर्ड) हा केस-सेन्सेटिव असतो आणि तुम्हाला पाठविण्यात आलेल्या आयपिन पाकिटात नमूद केल्यानुसार तो लोअर किंवा अप्पर केसमध्ये लिहिला गेला नसेल.
  • १८० दिवसांहून अधिक काळ खाते वापरले गेले नसेल.
Top


माझा पासवर्ड विसरला असेल तर मी कसे लॉगईन करावे?
तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असल्यास तुम्ही तो ऑनलाईन पुन्हा निर्माण करू शकाल.तुमचे नेटबँकिंग आयपिन ऑनलाईन पुन्हा निर्माण करण्यासाठी खालील टप्पे आहेतः
  • ‘इन्स्टा आयपिन’ लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा ग्राहक आयडी क्रमांक लिहा आणि खात्री करा.
  • ग्राहक आयडीला जोडण्यात आलेल्या एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डाची यादी दर्शविली जाईल
  • जोडण्यात आलेले कोणतेही एक कार्ड निवडा
  • तुमचे एटीएम पिन आणि अंतिम मुदतीची तारिख लिहा.
  • तुम्हाला त्यानंतर तुमचा नेटबँकिंगचा पासवर्ड रिसेट (आयपिन) करण्यास आणि त्याची खात्री करण्यास सांगितले जाईल.
  • आता नविन तयार करण्यात आलेल्या पासवर्डने तुम्ही पुन्हा लॉगइन करू शकाल.
Top


मी माझा पासवर्ड कसा बदलावा?
तुमचा आयपिन (पासवर्ड) बदलण्यासाठी कृपया खाली दिलेल्या सूचनांचे पालन कराः
  • नेटबँकिंग लॉगईन विभागात जा आणि तुमचा ग्राहक आयडी आणि पासवर्ड भरा. पासवर्ड केस-सेन्सेटिव आहे. आयपिन पाकिटात नमूद केल्यानुसार तो अप्पर लोअर केसमध्ये नमूद करा.
  • तुम्ही लॉगईन केल्यावर तुम्ही पासवर्ड बदलण्याच्या पर्यायाचा उपयोग करून पासवर्ड बदलू शकता. पासवर्ड अक्षरे-आकडे संमिश्र असावा आणि १५ आकड्यांचा किंवा त्याहून कमी असावा.
Top


मला ‘‘प्रवेश नाकारला’’ असा संदेश येतो. मी काय करावे?
तुम्हाला बाहेर ठेवण्याची ही कारणे असू शकतातः
  • तुम्ही १८० दिवसांहून अधिक काळ नेटबँकिंगचा उपयोग केला नसेल.
  • तुम्ही चुकीचा आयपिन (पासवर्ड) पाच (५) वेळा वापरला असेल आणि ती तुमची उपयोगकर्त्याद्वारे झालेली चूक असू शकते.
  • जर आयपिन विसरला असेल तर तुमच्याकडून अधिकृत विनंती आल्यावर तो पुन्हा निर्माण करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नसतो.
Top


मी माझा पासवर्ड बदलला आहे परंतु मला माझा जुना किंवा नविन पासवर्ड वापरता येत नाही. मी काय केले पाहिजे?
हे शक्य आहे कारणः
  • तुम्ही नविन आयपिन (पासवर्ड) बरोबर नमूद केला नाही किंवा
  • पाचवेळा अयशस्वी प्रयत्न केल्यावर सुरक्षिततेच्या कारणास्तव नेटबँकिंगची उपलब्धता अकार्यान्वित करण्यात आली असेल.

  • तुम्हाला तुमचा आयपिन लक्षात असेल तर तुम्हाला नेटबँकिंग उपलब्ध करून देणे कार्यान्वित करण्याची विनंती करण्यासाठी येथे क्लिक करा.

  • तुम्ही तुमचा आयपिन विसरला असल्यास तो ताबडतोब पुन्हा निर्माण करण्यासाठी येथे क्लिक करा.

    किंवा
    नेटबँकिंग पासवर्ड पुन्हा निर्माण करण्याचे प्रपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. पूर्ण भरलेले प्रपत्र जवळच्या एचडीएफसी बँकेच्या शाखेत सादर करता येईल.

    किंवा

    तुम्ही तुमचा आयपिन विसरला असल्यास तुम्हाला तो पुन्हा निर्माण करण्याची विनंती सादर करावी लागेल. तुमच्यापाशी दूरध्वनि ओळख क्रमांक असल्यास (टीआयएन) तुम्ही फोनबँकिंगशी संपर्क साधू शकता.

    Top



मी माझा आयपिन (पासवर्ड) कसा ब्लॉक करावा किंवा त्याची नोंदणी कशी रद्द करावी?
तुमचा आयपिन ब्लॉक करण्यासाठी आम्हाला तुमच्याकडून लेखी सूचना मिळाल्या पाहिजेत.
Top



अधिक सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी मी कोणत्या उपाययोजना करू शकेन?
  • तुमचा पीसी सोडून जाताना तुम्ही लॉगआऊट केले पाहिजे.
  • तुमचा पासवर्ड सतत बदला, ‘‘मजबूत’’ ६ किंवा ८ आकडी पासवर्ड (अक्षरे-आकडे संमिश्र) निवडा आणि तो नियमित बदला, सहजसोपे पासवर्ड टाळा (कुटुंबाच्या सदस्याचे, प्राण्याचे नाव, आवडता संगितकार, वगैरे), आणि तुमचा पासवर्ड इतर कोणालाही सांगू नका.
  • तुम्ही कोणत्याही अशा कागदावर पासवर्ड लिहू नये जो इतर कोणालाही सहज उपलब्ध होईल.
  • तुमच्या संगणकावर पॉवर-ऑन पासवर्ड टाका ज्यामुळे तुमचा संगणक इतर कोणीही सुरू करू शकणार नाही.
  • स्क्रिनसेवरला पासवर्ड द्या त्यामुळे तुम्ही इतरत्र गेले असता इतर कोणीही तुमचे कार्यस्थळ वापरू शकणार नाही.
  • इतर कोणाला तुमचा पासवर्ड समजला आहे असे तुम्हाला वाटत असल्यास ऑनलाईन जा आणि तो ताबडतोब बदला.
  • तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी इंटरनेट वापरत असाल (म्हणजे सायबर कॅफेवर) तर संगणकाकडे दुर्लक्ष करू नका, आणि तुम्ही काय टाईप करत आहात हे कोणी पहात नाही ह्याची काळजी घ्या.
  • तुमचे सत्र पूर्ण झाल्यावर नेटबँकिंगमधून लॉगऑफ करा. लॉगआऊट करण्यासाठी लॉगआऊट बटन वापरा म्हणजे सत्र बंद होईल आणि लॉगऑफ करण्यासाठी विन्डो बंद करू नका. ह्यामुळे तुमच्या ऑनलाईन सत्रातील मागील पाने तुमच्या संगणकाद्वारे पाहण्यावर प्रतिबंध केला जाईल.
  • तुम्ही व्यक्तिगत फायरवॉल वापरण्याचा विचार करावा, ज्यामुळे अनधिकृत व्यक्तीला तुमचा संगणक उपलब्ध होण्यापासून प्रतिबंध होईल आणि तुमच्या संगणकावर वाईट हेतूने इतर प्रोग्राम समाविष्ट करण्यावर देखरेख ठेवली जाईल.
Top



क्रेडिट कार्डस नेटबँकिंगसाठी कोण पात्र आहे?
सर्व एचडीएफसी बँकेचे ग्राहक जेः
  • नेटबँकिंग उपयोगकर्ते आहेत आणि त्यांच्यापाशी
  • एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आह

तुमच्या कार्डाचा नेटबँकिंगद्वारे उपयोग करण्यासाठी तुमचे कार्ड नियमित स्थितीत असले पाहिजे.

Top



क्रेडिट कार्डस नेटबँकिंगसाठी काही शुल्क आहे का?
नाही. ही सेवा मोफत देऊ केली जाते.
Top



क्रेडिट कार्डस नेटबँकिंगसाठी मी कशी नोंदणी करावी?
नेटबँकिंगसाठी तुमच्या क्रेडिट कार्डाची नोंदणी करणे सोपे आहे.
  • तुम्ही जर एचडीएफसी बँक खातेदार असाल तर आणि नेटबँकिंगसाठी नोंदणी केली असल्यासः

    टप्पा १ एचडीएफसी बँक संकेतस्थळावर ‘‘नेटबँकिंग’’ पर्याय निवडा आणि लॉगइनवर क्लिक करा
    टप्पा २ पुढील पानावर ‘‘पुढे सुरू’’ बटन क्लिक करा.
    टप्पा ३ आता तुम्ही नेटबँकिंग लॉगइन पानावर आला आहात. कृपया लॉगइन करण्यासाठी तुमचा ग्राहक ओळख क्रमांक आणि नेटबँकिंग पासवर्ड टाईप करा. ह्यामुळे तुम्ही नेटबँकिंग पानावर याल ज्यात तुम्हाला देते तुमच्या खात्यातील सर्व गोषवार्‍याचा तपशिल आणि व्यवहाराचे इतर पर्याय दिले जातील.
    टप्पा ४ कृपया ‘‘क्रेडिट कार्ड’’ बटनावर क्लिक करा
    टप्पा ५ डावीकडच्या भागातील  ‘‘नविन कार्ड नोंदवा’’ पर्यायावर क्लिक करा
    टप्पा ६ कृपया तुमचा १६ आकडी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड क्रमांक, अंतिम मुदतीची तारिख आणि तुमचा क्रेडिट कार्ड पिन क्रमांक लिहा व तुमचे क्रेडिट कार्ड नेटबँकिंग आयडीशी जोडण्यासाठी ‘‘सादर करा’’ वर क्लिक करा.

  • तुम्ही जर एचडीएफसी बँकेचे खातेदार असाल आणि नेटबँकिंगसाठी नोंदणी केली नसेल तर तुम्हाला नेटबँकिंग प्रपत्र भरून प्रथम नोदणी करावी लागेल.

 ई-एज बँकिंग प्रपत्र (खाली) डाऊनलोड करा, ते पूर्ण भरा आणि एचडीएफसी बँकेच्या जवळच्या शाखेत ते सादर करा.

Top



क्रेडिट कार्डस नेटबँकिंग वापरण्यासाठी मी काय करावे?
सध्या, तुम्ही खालील क्रेडिट कार्डस नेटबँकिंग सुविधांचा उपयोग करू शकताः

नोंदणी करणे
नोंदणी रद्द करणे
खात्याची माहिती पाहणे
बिल न केलेले व्यवहार पाहणे
क्रेडिट कार्ड स्टेटमेन्ट पाहणे व डाऊनलोड करणे
ऑटोपेसाठी नोंदणी करणे व नोंदणी रद्द करणे
क्रेडिट कार्डाचे पैसे भरणे
संपर्काच्या माहितीत सुधारणा करणे
Top



क्रेडिट कार्डस खात्यातील गोषवार्‍यात मला कोणती माहिती पाहता येईल?
पडद्यावर खालील क्रेडिट कार्डास खात्याचा तपशिल दाखविला जातो
  • एकुण क्रेडिट मर्यादा
    (कार्ड सेटअपच्या वेळी निश्चित करण्यात आलेली ही एकुण क्रेडिय मर्यादा आहे)
  • उपलब्ध क्रेडिट मर्यादा
    (आज तुम्हाला उपलब्ध असलेली ही क्रेडिट मर्यादा आहे आणि ती एकुण थकबाकी वगळता आहे - बिल केलेली किंवा बिल न केलेली)
  • उपलब्ध रोख मर्यादा
    (ही आजच्या दिवशी तुम्हाला उपलब्ध असलेली रोख मर्यादा आहे)
  • एकुण बिल केलेली रक्कम
    (तुमच्या अलिकडच्या स्टेटमेन्टच्या तारखेपर्यंतची ही एकुण बिल केलेली रक्कम आहे)
  • पैसे भरण्याची शेवटची तारिख
    (ही तुमच्या अलिकडच्या स्टेटमेन्टची पैसे भरण्याची शेवटची तारिख आहे)
  • किमान देय रक्कम
    (ही तुमच्या अलिकडच्या स्टेटमेन्टची किमान देय रक्कम आहे)
  • एकुण बिल न केलेली रक्कम
    (अलिकडच्या स्टेटमेन्टच्या तारखेनंतर केलेल्या सर्व व्यवहारांची ही बेरिज आहे जे तुमच्या क्रेडिट कार्डावर अगोदरच बिल केले आहे)
  • एकुण अधिकृत केलेली थकबाकी
    (अलिकडच्या स्टेटमेन्टच्या तारखेनंतर केलेल्या केलेल्या सर्व व्यवहारांची ही बेरिज आहे जे तुम्ही अधिकृत केले आहेत परंतु तुमच्या खात्यात त्याचे अजून बिल करायचे आहे. तुम्ही जर संपर्क-साधल्यावर-रोख ह्या सुविधेचा लाभ घेतला असेल तर त्यात संपर्क-साधल्यावर-रोख मधील मुद्दलाची रक्कम समाविष्ट आहे जी तुमच्या कार्डाच्या खात्यात थकबाकी आहे)
  • रिवॉर्डस पॉइंटस शिल्लक - मागील स्टेटमेन्ट
    (मागील स्टेटमेन्टच्या तारखेपासून तुम्ही जमा केलेले एकुण रिवॉर्ड पॉइंटस ह्यात दिसून येतात)
  • रिवॉर्डस पॉइंटस शिल्लक - आताचे पॉइंटस
    (तुमच्या कार्डाच्या खात्यात सध्या असलेले एकुण रिवॉर्डस पॉइंटस ह्यात दिसून येतात)
Top



क्रेडिट कार्डस नेटबँकिंग मध्ये माझ्यासाठी काही खास फायदे आहेत का?
क्रेडिट कार्डस नेटबँकिंगमुळे तुमची वेळ वाचते आणि कोणत्याही गोंधळाशिवाय तुमच्या घरून व्यवहार करण्याची सोय तुम्हाला उपलब्ध होते.
Top



मी क्रेडिट कार्डस नेटबँकिंगची नोंदणी रद्द कशी करू शकेन?
कृपया पॅनेलच्या डाव्या बाजूला असलेल्या नोंदणी रद्द करा पर्यायावर क्लिक करा आणि तुमच्या कार्डावरील नेटबँकिंग सुविधा खंडित करण्यासाठी कार्ड क्रमांक निवडा.
Top



माझ्या पाशी माझा क्रेडिट कार्ड एटीएम पिन क्रमांक नसेल तर मी क्रेडिट कार्ड नेटबँकिंगसाठी नोंदणी कशी करावी?
नविन एटीएम पिन क्रमांक निर्माण करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या क्रेडिट कार्डस ग्राहक सेवा क्रमांकाशी संफ साधू शकता.

तुम्हाला तुमचा नविन एटीएम पिम क्रमांक मिळाला की तुम्ही क्रेडिट कार्ड नेटबँकिंगसाठी नोंदणी करू शकता.क्रेडिट कार्डस ग्राहक क्रमांक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Top



अधिक सुरक्षिततेसाठी मी कोणत्या उपाययोजना कराव्यात?

  • तुमचा पीसी सोडून जाताना तुम्ही लॉगआऊट केले पाहिजे.
  • तुमचा पासवर्ड सतत बदला, ‘‘मजबूत’’ ६ किंवा ८ आकडी पासवर्ड (अक्षरे-आकडे संमिश्र) निवडा आणि तो नियमित बदला, सहजसोपे पासवर्ड टाळा (कुटुंबाच्या सदस्याचे नाव, प्राण्याचे नाव, आवडत्या संगितकाराचे नाव,वगैरे), आणि तुमचा पासवर्ड इतर कोणालाही सांगू नका.
  • तुम्ही कोणत्याही अशा कागदावर पासवर्ड लिहू नये जो इतर कोणालाही सहज उपलब्ध होईल.
  • तुमच्या संगणकावर पॉवर-ऑन पासवर्ड टाका ज्यामुळे तुमचा संगणक इतर कोणीही सुरू करू शकणार नाही.
  • स्क्रिनसेवरला पासवर्ड द्या त्यामुळे तुम्ही इतरत्र गेले असता इतर कोणीही तुमचे कार्यस्थळ वापरू शकणार नाही.
  • इतर कोणाला तुमचा पासवर्ड समजला आहे असे तुम्हाला वाटत असल्यास ऑनलाईन जा आणि तो ताबडतोब बदला.
  • तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी इंटरनेट वापरत असाल (म्हणजे सायबर कॅफेवर) तर संगणकाकडे दुर्लक्ष करू नका, आणि तुम्ही काय टाईप करत आहात हे कोणी पहात नाही ह्याची काळजी घ्या.
  • तुमचे सत्र पूर्ण झाल्यावर नेटबँकिंगमधून लॉगऑफ करा. लॉगआऊट करण्यासाठी लॉगआऊट बटन वापरा म्हणजे सत्र बंद होईल आणि लॉगऑफ करण्यासाठी विन्डो बंद करू नका. ह्यामुळे तुमच्या ऑनलाईन सत्रातील मागील पाने तुमच्या संगणकाद्वारे पाहण्यावर प्रतिबंध केला जाईल.
  • तुम्ही व्यक्तिगत फायरवॉल वापरण्याचा विचार करावा, ज्यामुळे अनधिकृत व्यक्तीला तुमचा संगणक उपलब्ध होण्यापासून प्रतिबंध होईल आणि तुमच्या संगणकावर वाईट हेतूने इतर प्रोग्राम समाविष्ट करण्यावर देखरेख ठेवली जाईल.
Top



जर एखाद्या खात्याच्या सुरक्षिततेविषयी तडजोड होत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास आमच्याशी ताबडतोब संपर्क साधा. ताबडतोब संपर्क साधा.
Top
आताच नोंदणी करा
    नेटबँकिंगचा उपयोग करण्यास तयार आहात का?   नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

हे पान ई-मेल करा. हे पान छाप
नेटबैंकिंग डेमो
आमच्याशी संपर्क साधा
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.