You are here: व्यक्तिगत बैंकिंग एक्सेस यूअर बैंक > नेटबैंकिंग                                 English Version                                 Hindi Version

Net banking
दृष्टिक्षेप
सुरक्षित उपलब्धता
थर्ड पार्टी हस्तांतरण
इन्स्टा आयपिन सुविधा
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच नोंदणी करा
नेटबँकिंगला लॉग इन करा
Net banking
नेटबँकिंग ही एचडीएफसी बँकेची इंटरनेट बँकिंग सेवा आहे. ह्यामध्ये अगदी त्या सेकंदापर्यंतची खात्याची माहिती पुरविली जाते.  नेटबँकिंगमुळे तुम्हाला तुमच्या माऊसद्वारे आरामशिर कोणत्याही वेळी, कोठूनही तुमच्या खात्याचे व्यवस्थापन करता येते.
सादर आहे नेटबँकिंगसाठी नोंदणी करण्याची सोपी पद्धती
लांबच लांब रांगा आणि कागदाच्या कामाला आता निरोप द्या. नेटबँकिंगसाठी नोंदणी करण्यासाठी सादर आहे अजून एक कारण. तुम्ही आता नेटबँकिंगची नोंदणी करण्यासाठी फोनबँकिंगच्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. नोंदणी प्रक्रियेबद्दलच्या अधिक माहितीसाठी, कृपया येथे क्लिक कराः
मी नेटबँकिंगचा उपयोग करून काय करू शकेन?
ह्या उद्योगातील आमची अग्रणी सेवा तुमच्या अगदी बोटांच्या टोकावर कित्येक सेवा उपलब्ध करून देतेः

खात्यातील शिल्लक आणि स्टेटमेन्टस पहा.
एका खात्यातून दुसर्‍या खात्यात निधी हस्तांतरित करा.
ऑनलाईन मुदत ठेव तयार करा.
डिमांड ड्राफ्टची विनंती करा.
बिले भरा.
धनादेश पुस्तिकेची मागणी करा.
धनादेशावरील पैसे थांबवा.
आणि कितीतरी
तुम्ही ऑनलाईन काय करू शकता ह्याबद्दल आमचा नेटबँकिंगचा डेमो पहा.
मी नेटबँकिंगचा उपयोग का करावा?
इंटरनेटबँकिंग हा तुमचे खाते वापरण्याचा सर्वाधिक सुलभ आणि सक्षम मार्ग आहे.

नेटबँकिंग हे प्रत्यक्ष वेळेपर्यंतची, अगदी त्या सेकंदापर्यंतची तुमच्या खात्याची माहिती देणारे आहे.
ते कोणत्याही वेळी कोठूनही उपलब्ध करून घेता येते, व अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या पैशावर संपूर्ण नियंत्रण मिळते.
उभे राहण्यासाठी आता रांगा नाहीत किंवा आपली वेळ येण्याची वाट पहाणे नको. नेटबँकिंगद्वारे तुम्हाला संपूर्ण नियंत्रण मिळते.
एचडीएफसी बँकेची नेटबँकिंग सेवा सुरक्षित आहे. औद्योगिक क्षेत्रातील प्रमाणित तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा उपयोग करून आमच्या सेवा तुम्हाला मानसिक शांती देतात.
तेव्हा पुढील वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या शाखेला भेट देण्याचा विचार कराल तेव्हा त्याऐवजी तुमच्या पीसीकडे वळा.
ते वापरण्यास किती सोपे आहे हे पाहण्यासाठी नेटबँकिंगचा डेमो पहा.

आताच नोंदणी करा
 नेटबँकिंगचा उपयोग करण्यास तयार आहात का? नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

E-mail this page हे पान ई-मेल करा. Print this page हे पान छापा
नेटबैंकिंग डेमो
आमच्याशी संपर्क साधा
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.